परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाने शेअर केला बाळाचा फर्स्ट PHOTO, ठेवलंय यूनिक नेम; काय आहे अर्थ?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आपल्या लाडक्या मुलासोबतच्या पहिला फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी बाळाचं नावदेखील जाहीर केलं आहे.
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा नुकतेच आई-बाबा झाले आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधीच मुलगा झाल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता एका महिन्यानंतर त्यांनी आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. कपलने मुलासाठी एक अतिशय अनोखे आणि अर्थपूर्ण नाव निवडले असून लोकांना ते खूप आवडत आहे. परिणीती आणि राघव यांचे बाळासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय आहे मुलाचं नाव?
परिणीती चोप्रा आणि राघव यांनी पोस्टमध्ये मुलाचे नाव 'नीर' (Neer) असे जाहीर केले. नीर म्हणजे पाणी. नीर हा हिंदी शब्द असून हे नाव खूप कमी ऐकायला मिळतं. दोघांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,"जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् तत्र एव नीर. आम्ही त्याचे नाव ठेवले ‘नीर’ – शुद्ध, दिव्य, असीम".
advertisement
advertisement
परिणीती आणि राघव यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दोघेही बाळाच्या पायांना किस करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी बाळाचे पाय हातात घेतले आहेत. विशेष म्हणजे, नीर हे नाव परिणीती आणि राघव यांच्या नावांच्या मिश्रणातूनही तयार झाले आहे.
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
परिणीती आणि राघव यांच्या फोटोवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. भारती सिंहने लिहिले आहे, "अले!" अशी कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे,"खूपच अनोखे नाव आहे.", दुसऱ्याने लिहिलं आहे,"हॅपी वन मंथ लिटिल नीर, तुमच्या छोट्या राजाचं नाव किती सुंदर आहे!". गौहर खान निमरित कौर आणि राजीव अदित्यासारख्या कलाकारांनीही परिणीती-राघवच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
advertisement
परिणीती आणि राघव यांनी ऑक्टोबरमध्ये चाहत्यांसोबत प्रेग्नंसीची गुडन्यूज शेअर केली होती. त्यानंतर ऐन दिवाळीत त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. परिणीती आणि राघववर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. परिणीती सध्या आपल्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाने शेअर केला बाळाचा फर्स्ट PHOTO, ठेवलंय यूनिक नेम; काय आहे अर्थ?


