Success Story : दिवसा नोकरी, संध्याकाळी फूड कार्ट, दाम्पत्याने केला यशस्वी व्यवसाय, महिन्याची कमाई तर पाहाच

Last Updated:

अपूर्वा आणि अक्षय यांना कॉर्पोरेट नोकरी करत असतानाच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि यातूनच मस्त खाऊ तृप्त राहू या फूड कार्टचा प्रारंभ झाला.

+
दिवसा

दिवसा नोकरी, संध्याकाळी फूड कार्ट—अपूर्वा आणि अक्षयचा यशस्वी खाद्यव्यवसाय!

मुंबई : अनेक जण नोकरीकरत व्यवस्याला प्राधान्य देत आहेत. प्रभादेवीमधील अपूर्वा आणि अक्षय यांना कॉर्पोरेट नोकरी करत असतानाच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि यातूनच मस्त खाऊ तृप्त राहू या फूड कार्टचा प्रारंभ झाला. दोन वर्षांपूर्वी केलेला विचार आज अस्तित्वात उतरला आहे. अपूर्वा सांगतात, आम्ही दोघेही फूड प्रेमी आहोत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्स टेस्ट करायला आवडतात आणि हाच अनुभव आमच्या फूड व्यवसायाला चालना देत आहे.
त्यांचे खाद्यपदार्थ एकदम घरगुती असतात ज्यात मोमोस, बर्गर, कोल्ड कॉफी आणि फ्रायझ यांचा समावेश आहे. या पदार्थांची तयारी ते घरातूनच करत असतात. अक्षय यांनी सांगितलं, खूप मेहनत लागते पण आम्ही न थांबता हे करत आहोत. दिनचर्येत खूप धावपळ आहे, झोप नाही मिळत पण आम्ही थांबायचं नाही असं ठरवलं आहे. आम्ही रोज संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत या फूड कार्टमध्ये खाद्यपदार्थ देतो.
advertisement
मस्त खाऊ तृप्त राहू या फूड कार्टला सुरुवातीला थोडा प्रतिसाद मिळाला परंतु आज ते विविध ठिकाणांहून लोकांना आकर्षित करत आहेत. सायन, घाटकोपर, भांडुप, ठाणे अशा ठिकाणांहून लोक येतात आणि त्यांना अपूर्वा-अक्षयच्या पदार्थांचा स्वाद आवडतो. आम्हाला आमच्या व्यवसायाला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप छान वाटते, असे अपूर्वा म्हणाल्या.
advertisement
हा व्यवसाय ते पार्ट-टाइम करत असताना देखील या फूड कार्टमधून ते दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमवत आहेत. अपूर्वा आणि अक्षय यांचा हा अनुभव अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांचे उदाहरण सांगते की, मेहनत आणि आवडीला योग्य दिशा दिल्यास कोणताही छोटा व्यवसायही यशस्वी होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : दिवसा नोकरी, संध्याकाळी फूड कार्ट, दाम्पत्याने केला यशस्वी व्यवसाय, महिन्याची कमाई तर पाहाच
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement