हिवाळ्यात तुमचा ट्रॅक्टर सारखा बंद पडतोय का? मग या 5 टिप्स नक्की फॉलो करा

Last Updated:
Tractor Maintaince Tips - राज्यात हिवाळ्याची चाहूल लागताच शेतकऱ्यांची सर्वांत मोठी अडचण म्हणजे ट्रॅक्टर वारंवार बंद पडणे किंवा सुरू न होणे. तापमान कमी झाल्यानंतर डिझेल, इंजिन ऑइल, बॅटरी आणि फिल्टर सिस्टमवर परिणाम होतो.
1/6
Tractor news
राज्यात हिवाळ्याची चाहूल लागताच शेतकऱ्यांची सर्वांत मोठी अडचण म्हणजे ट्रॅक्टर वारंवार बंद पडणे किंवा सुरू न होणे. तापमान कमी झाल्यानंतर डिझेल, इंजिन ऑइल, बॅटरी आणि फिल्टर प्रणालीवर परिणाम होतो. यामुळे शेतीची कामं अडतात आणि खर्चही वाढतो. अशा वेळी योग्य खबरदारी घेतली तर ट्रॅक्टर हिवाळ्यातही सुरळीत चालू शकतो. तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या टिप्स पाळल्या तर मशीनची कार्यक्षमता टिकून राहते आणि ब्रेकडाऊनची शक्यता कमी होते. आज आम्ही तुम्हाला या समस्यांवर उपाय सांगणार आहोत..
advertisement
2/6
इंजिन ऑइल तपासा आणि वेळेवर बदला
इंजिन ऑइल तपासा आणि वेळेवर बदला -  हिवाळ्यात इंजिन ऑइल अधिक घट्ट होते. त्यामुळे इंजिन सुरू होण्यास वेळ लागतो आणि गाडी बंद पडण्याची शक्यता वाढते. म्हणून, तापमान कमी होताच ट्रॅक्टरचे इंजिन ऑइल तपासणे गरजेचे आहे. जुने किंवा घट्ट झालेले ऑइल इंजिनवर ताण आणते. योग्य ग्रेडचे आणि कंपनीने सुचवलेले ऑइल वापरल्यास ट्रॅक्टर सुरू होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होते.
advertisement
3/6
बॅटरीची क्षमता आणि चार्ज तपासा
बॅटरीची क्षमता आणि चार्ज तपासा - थंड वातावरणात बॅटरीचा चार्ज लवकर कमी होतो. त्यामुळे ट्रॅक्टर स्टार्ट होण्यात अडथळे येतात. हिवाळ्याआधी बॅटरीचे सेल, वायरिंग आणि चार्जिंग सिस्टीम तपासून घ्या. बॅटरी टर्मिनलवर धूळ किंवा गंज असल्यास स्वच्छ करा. जर बॅटरी 2-3 वर्षांपेक्षा जुनी असेल आणि वारंवार चार्जिंगची गरज लागत असेल तर नवीन बॅटरी बसवणे फायदेशीर ठरते.
advertisement
4/6
डिझेल टाकीत पाणी राहणार नाही याची काळजी घ्या
डिझेल टाकीत पाणी राहणार नाही याची काळजी घ्या -  हिवाळ्यात डिझेलमध्ये पाण्याचे कण तयार होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे इंजेक्शन पंप आणि फिल्टर ब्लॉक होऊ शकतात. ट्रॅक्टर अचानक बंद पडण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. म्हणून, डिझेल टाकीतला पाणी सेपरेटर नियमितपणे रिकामा करा. शक्य असल्यास रात्री ट्रॅक्टर उघड्यावर न ठेवता शेडमध्ये ठेवा. उच्च गुणवत्तेचे डिझेल वापरल्यासही हिवाळ्यातील समस्या कमी होतात.
advertisement
5/6
एअर आणि फ्युएल फिल्टर साफ ठेवा
एअर आणि फ्युएल फिल्टर साफ ठेवा -  थंडीच्या दिवसांत फिल्टरमध्ये धूळ, ओलावा आणि घाण साचते, ज्यामुळे ट्रॅक्टरची क्षमता कमी होते आणि मशीन बंद पडते. त्यामुळे दर काही दिवसांनी एअर फिल्टर साफ करणे, आणि फ्युएल फिल्टर तपासणे अत्यंत गरजेचे आहे. जर फिल्टर जुने किंवा खराब झाले असतील तर ते बदललेले चांगले.
advertisement
6/6
इंजिन योग्य प्रकारे गरम करा
इंजिन योग्य प्रकारे गरम करा - हिवाळ्यात ट्रॅक्टर सुरू केल्यानंतर लगेच जड काम करू नये. इंजिनला किमान 5 ते 7 मिनिटे गरम होऊ द्या. त्यामुळे इंजिन ऑइल सर्वत्र व्यवस्थित पसरते आणि इंजिनचा घर्षण कमी होतो. जर ट्रॅक्टरला ग्लो प्लग असेल तर ते योग्यरित्या काम करत आहेत की नाही? हे तपासणेही गरजेचे आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement