मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीचे मुखवटे, फक्त 100 रुपयांपासून, मुंबईत इथं करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा महिना जवळ येताच पूजेच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
मुंबई : मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात येत्या 21 तारखेपासून होत असल्याने दादर परिसरात मार्गशीर्ष गुरुवाराच्या पूजा-विधीची धामधूम सुरू झाली आहे. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा महिना जवळ येताच पूजेच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. कीर्तीकर मार्केटलगत वीर सावरकर भाजी मार्केटच्या शेजारी, साई लक्ष्मी लंच होमच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका स्टॉलवर आकर्षक आणि किफायतशीर दरात साहित्य उपलब्ध होत असल्याने महिलांची विशेष गर्दी दिसत आहे.
देवीची स्थापना करण्यासाठी लागणारे मूलभूत साहित्य केवळ 20 रुपयांपासून उपलब्ध आहे. मार्गशीर्ष गुरुवारी देवीच्या मुखवट्यांची विशेष मागणी असते. महालक्ष्मी, रेणुका, तुळजाभवानी, एकविरा यांसह विविध देवींचे आकर्षक मुखवटे 100 रुपयांपासून मिळत असून काही मोठ्या आणि नक्षीदार मुखवट्यांची किंमत 400 ते 500 रुपये इतकी आहे. देवीचे वस्त्रदेखील स्त्रियांचे लक्ष वेधून घेत असून त्याची किंमत 250 ते 350 रुपये इतकी आहे. पूजेतील दागिने आणि अन्य अलंकारांमध्ये मंगळसूत्र, डोरलं, कवडी माळ, लक्ष्मी हार अशी विविध सामग्री 20 ते 60 रुपयांच्या दरात मिळत आहे.
advertisement
पूजेकरिता आवश्यक असणारा पाट-आसन फक्त 100 रुपयांना मिळत आहेत. सर्वात आकर्षक बाब म्हणजे पूजेचे सर्व साहित्य एकत्रितपणे उपलब्ध असलेला पूर्ण सेट विशेष लोकप्रिय ठरत आहे. या सेटमध्ये दागिने, मुखवटा, गंगावन, वेणी, वस्त्र अशा सर्व गोष्टींचा समावेश असून त्याची किंमत फक्त 350 रुपये आहे. मार्गशीर्ष गुरुवार जवळ आल्याने दादरमधील बाजारपेठेचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीचे मुखवटे, फक्त 100 रुपयांपासून, मुंबईत इथं करा खरेदी

