Success Story : शेतीला निवडला जोड व्यवसाय, तरुण शेतकरी करतोय दूध विक्री, महिन्याला 1 लाखांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
रवी वाघ यांचा गाय आणि म्हैस पालन व्यवसाय आहे. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून वाघ यांची एक लाखांच्यावर उलाढाल आहे.
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथील रवी वाघ यांचा शेतीसोबत गाय आणि म्हैस पालन व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 12 गायी तर 6 म्हशी आहेत. दररोज गाईंचे 120 लिटर दूध तर म्हशींचे 30 असे एकूण 150 लिटर दूध काढले जाते आणि ते दूध डेअरीसाठी विक्री केले जाते. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून वाघ यांची एक लाखांच्यावर उलाढाल आहे तर खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपये नफा मिळत असल्याचे वाघ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
कुंभेफळ येथील रवी वाघ हे गाय पालनाच्या माध्यमातून दूध व्यवसाय करत आहेत. गाईंचे दिवसभराचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी पाच वाजता सर्व गाईंचे दूध काढावे लागते, त्यानंतर त्यांचा चारा आणि वैरणाची सोय केली जाते. चाऱ्यामध्ये मेथी घास आणि काही प्रमाणात सुका घास दिला जातो.
Success Story : 10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल
advertisement
म्हशी आणि गाईंसाठी लागणारा चाऱ्यातील घास हा वर्षभराचा एकदाच साठवला जातो. जशी गरज भासेल त्या पद्धतीने या घासाचा वापर केला जातो. तसेच जनावरांना पाण्यासाठी गोठ्याजवळच मोठा हौद देखील आहे. जनावरांना मोकळे सोडले की चारा खातात आणि पाणीही पितात, त्यामुळे गाय पालन अवघड जात नाही, असे देखील वाघ यांनी म्हटले आहे.
advertisement
गाय पालन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे?
view commentsनवीन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कमी जनावरांपासून सुरुवात करावी. गोठ्याची आणि योग्य खाद्याची व्यवस्था करावी. गायपालन, म्हैस पालन असो या व्यवसायामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्यास आणखी जनावरांची वाढ करता येऊ शकते. तसेच मुक्त गोठा पद्धत वापरल्यास जास्त मेहनत करण्याची आवश्यकता भासत नाही.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 18, 2025 3:53 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतीला निवडला जोड व्यवसाय, तरुण शेतकरी करतोय दूध विक्री, महिन्याला 1 लाखांची उलाढाल

