advertisement

Madhurani Gokhale : 'लोकांना कळायला हवं...' बेडवरील हॉट फोटोशूटवर पहिल्यांदाच बोलली मधुराणी गोखले

Last Updated:

Madhurani Prabhulkar Gokhale : मधुराणी प्रभुलकरने 'आई कुठे काय करते' मालिकेतील प्रतिमा मोडून बोल्ड फोटोशूट केले, ज्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ झाला.

मधुराणी प्रभुलकरने 'आई कुठे काय करते' मालिकेतील प्रतिमा मोडून बोल्ड फोटोशूट केले
मधुराणी प्रभुलकरने 'आई कुठे काय करते' मालिकेतील प्रतिमा मोडून बोल्ड फोटोशूट केले
मुंबई : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संयमी, सोज्वळ आणि संयमशील अरुंधती ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात इतकी ठसली आहे, की मधुराणी प्रभुलकर यांना प्रत्यक्षात पाहणाऱ्या लोकांना विश्वास बसत नाही की ती तीच अभिनेत्री आहेत. पण याच प्रतिमेचा चौकोन तोडण्याचा निर्णय मधुराणीने घेतला. नुकतंच मधुराणीने एक फोटोशूट करून सोशल मीडियावर बोल्ड अंदाजातील तिचे फोटो पोस्ट केले आहेत. यानंतर मात्र एकच गदारोळ झाला.
मधुराणीने नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून तिने बेडवर मादक पोजमध्ये फोटो काढले आहेत. या लूकसोबतच तिने दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेणारं होतं – “फक्त या उन्हाळ्यानेच एवढे हॉट का असावे?” या फोटोंमध्ये मधुराणी खरोखरच हॉट दिसत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मात्र काहींना तिचा हा अंदाज आवडला नाही. या फोटोशूटमुळे मधुराणीला टीकेचाही सामना करावा लागला आहे.
advertisement
दरम्यान, मधुराणीने आता तिच्या या फोटोशूटबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "आपण अनेकदा आपल्यातली वेगळी बाजू पाहिलेली नसते. आपणच ती बघितलेली नसली, तर इतरांना कशी दिसेल? एखादा माणूस वेगवेगळा असतो. आपण त्याला एकाच पठडीत बसवतो, कारण आपल्याला ते आवडतं, ते सोयीचं असतं. कलाकारानं मात्र एकसारखं असून चालत नाही. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे माझं खरं वय तेच आहे, अनेकांना असं वाटतं; पण खरं तसं नाहीये. त्यामुळे कलाकार म्हणून ती प्रतिमा मोडण्यासाठी, स्वतःतलं नवं काही शोधण्यासाठी वेगळ्या रुपात येणं गरजेचं होतं." असं मधुराणी म्हणाली.
advertisement
advertisement
या नव्या लूकमुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं, काहींनी तिच्यावर टीका केली. पण ती त्या सगळ्यावर खंबीरपणे म्हणते, 'मला काही नाटकांसाठी विचारलं जातंय. पण मी ‘आई’, ‘घरची बाई’ अशा भूमिकांमध्ये न बसणाऱ्या भूमिकांचा विचार करतेय. कारण त्या प्रतिमेतून बाहेर पडणं गरजेचंच आहे. मधुराणी वेगळी कशी दिसू शकते, हे लोकांना कळायला हवं. तिचं खरं वयसुद्धा समजायला हवं.'
advertisement
फोटोशूटविषयी बोलताना ती म्हणाली, "जेव्हा तुमच्यातलीच एखादी बाजू तुम्हालाच माहीत नसते, तेव्हा ती इतरांना कशी दिसणार? म्हणूनच ही वेगळी बाजू स्वतःपुढे आणि प्रेक्षकांपुढे मांडणं गरजेचं आहे."
आता मालिकेनंतर मधुराणीला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी विचारणा सुरू झाली आहे. पण ती पुन्हा एकदा ‘आई’, ‘घरची बाई’ अशा भूमिकांमध्ये गुरफटून न पडता, स्वतःचं नवं रूप रंगमंचावर, स्क्रीनवर दाखवण्यासाठी सज्ज आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Gokhale : 'लोकांना कळायला हवं...' बेडवरील हॉट फोटोशूटवर पहिल्यांदाच बोलली मधुराणी गोखले
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement