'ज्यांनी निवडणूकीचं तिकीट मिळालं नाही...' BBM6 च्या घरात राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊंच्या उत्तराने वाढवला सस्पेन्स
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना, बिग बॉसच्या घरात एखादा राजकीय नेता धिंगाणा घालायला येणार का? या प्रश्नाने प्रेक्षकांना चांगलंच कोड्यात पाडलं होतं. होस्ट रितेश देशमुख याने यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेलं आहे, अशातच 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये यंदा कोणकोणते चेहरे दिसणार, यावरून सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेषतः राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना, बिग बॉसच्या घरात एखादा राजकीय नेता धिंगाणा घालायला येणार का? या प्रश्नाने प्रेक्षकांना चांगलंच कोड्यात पाडलं होतं. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत होस्ट रितेश देशमुख याने यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान व्हायरल होत आहे.
'बिग बॉस मराठी ६' चं तिकीट; रितेशची फटकेबाजी
पत्रकार परिषदेत जेव्हा रितेशला विचारण्यात आलं की, "बाहेर निवडणुकीचं तिकीट कोणाला मिळणार याची धाकधूक आहे, मग तुमच्या घरात एखाद्या राजकीय नेत्याला एन्ट्री मिळणार का?" यावर रितेशने आपल्या खास शैलीत गुगली टाकली.
advertisement
रितेश हसत म्हणाला, "ज्यांना बाहेर राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं नाही, त्यांना या बिग बॉसच्या घराचं तिकीट मिळूही शकतं आणि नाहीही. मला खरंच माहित नाही की आत नेमके कोण आहेत. पण एवढं नक्की की यंदाचा खेळ लय भारी होणार." रितेशच्या या उत्तरावर तिथे उपस्थित असलेल्या जान्हवी किल्लेकर हिनेही मजेत भन्नाट प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "राजकीय पक्षाचं तिकीट मिळवणं कदाचित सोपं असेल, पण बिग बॉसच्या घराचं तिकीट मिळवणं त्याहून कठीण आहे."
advertisement
advertisement
सागर कारंडेपासून दीपाली सय्यदपर्यंत; कोण आहेत शर्यतीत?
यंदाच्या पर्वात ग्लॅमरसोबतच विनोदाचा तडकाही जोरदार असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे यंदा घर गाजवायला सज्ज झाला आहे. त्याच्यासोबतच राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेल्या दीपाली सय्यद यांचं नावही आघाडीवर आहे. तसेच, नेहमीच आपल्या अभिनयाने हसवणारा अंशुमन विचारे देखील यंदा 'बिग बॉस'च्या घरात दिसण्याची शक्यता आहे. काही सोशल मीडिया स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर्सनाही यंदा 'स्वर्ग आणि नर्क' या थीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 6:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ज्यांनी निवडणूकीचं तिकीट मिळालं नाही...' BBM6 च्या घरात राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊंच्या उत्तराने वाढवला सस्पेन्स











