'पुन्हा एकदा साडे माडे तीन'चा धम्माल ट्रेलर, रिंकू राजगुरूसोबत 1:38 सेकंदाला खास सरप्राइज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Punha Ekda Sade Made Teen Trailer : पुन्हा एकदा साडे माडे तीन या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रिंकू राजगुरूबरोबर ट्रेलरमध्ये आणखी एक खास सरप्राइज प्रेक्षकांना मिळालं आहे.
कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूची एन्ट्री झाली आहेत रिंकूबरोबरच ट्रेलरमध्ये आणखी एक खास सरप्राइज प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे.
रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात सतत काही ना काही विचित्र घडताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की, काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक हा ट्रेलर देतो. त्यात त्यांच्या आयुष्यात रिंकूची एन्ट्री होते. रिंकूच्या येण्याने कुरळी बंधूंची झोपच उडते.
advertisement
आता रिंकू नेमकी कोण आहे? ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं थेट उत्तर ट्रेलर देत नाही. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होतं. 2 मिनिटं 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 1 मिनिटं 38 सेकंदाला प्रेक्षकांना खास सरप्राइज मिळालं आहे.
ट्रेलरमधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे. संवादांचा अचूक टाइमिंग, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही. बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव हाच गोंधळ या ट्रेलरचा आत्मा आहे. सिनेमात 1 मिनिटं 38 सेकंदाला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे, डॅनी पंडित आणि सारंग साठ्ये यांची झलक पाहायला मिळतेय. हे तिघे सिनेमातही असणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
advertisement
पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची महत्त्वाची भूमिका आहे. तर संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. पुन्हा एकदा साडे माडे 3 हा सिनेमा येत्या 30 जानेवारीला महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 4:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'पुन्हा एकदा साडे माडे तीन'चा धम्माल ट्रेलर, रिंकू राजगुरूसोबत 1:38 सेकंदाला खास सरप्राइज









