Shivsena BJP : वंचितचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला, भाजपला बाजूला ठेवून शिवसेना महापौर बसवणार!

Last Updated:

महाराष्ट्रामधल्या 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईमध्ये कुणाचा महापौर बसणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

वंचितचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला, भाजपला बाजूला ठेवून शिवसेना महापौर बसवणार!
वंचितचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला, भाजपला बाजूला ठेवून शिवसेना महापौर बसवणार!
मुंबई : महाराष्ट्रामधल्या 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईमध्ये कुणाचा महापौर बसणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्येही भाजपने अडीच वर्ष महापौरपद मिळावं, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महापालिकांमध्ये शिवसेना- भाजपमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गळाला लागल्यामुळे शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपला बाजूला ठेवून शिवसेनेचा महापौर

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात महापौरपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उल्हासनगरमध्ये असलेल्या 78 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 37-37 जागांवर विजय मिळाला, तर वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला. काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांना मिळून सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपने केला, पण आता शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
advertisement
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं आहे. यावेळी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.
आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करता यावीत, यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.
advertisement

शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत नाही

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. 78 जागांच्या या महापालिकेमध्ये बहुमतासाठी 40 ची संख्या गाठावी लागणार आहे, पण भाजप आणि शिवसेनेपैकी कुणालाही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही, त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना आपल्याकडे घेण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत होते, ज्यात शिवसेनेला यश आलं आहे. आम्ही भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करणार, असं शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी निकाल लागल्यानंतर स्पष्ट केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivsena BJP : वंचितचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला, भाजपला बाजूला ठेवून शिवसेना महापौर बसवणार!
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement