बॉलिवूडमधून सकाळी सकाळी Good News, अभिनेता राजकुमार राव झाला बाबा!

Last Updated:

Rajkumar Rao and Patralekha : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक आणि वाईट बातम्या समोर येत असतानाच एक गुड न्यूज ऐकायला मिळाली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हे आई-बाबा झालेत.

News18
News18
बॉलिवूडमधून सकाळी सकाळी आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आई बाबा झाले आहेत. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झालीत. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं असून दोघेही अत्यंत खुश आहे
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना लग्नाच्या चार वर्षांनी मुलगी झाली आहे. "आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका गोंडस मुलीचे वरदान दिलं आहे", असं म्हणत राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी पोस्ट शेअर केली आहे. राजकुमार रावने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाने आम्हाला दिलेला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे."
advertisement
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा आई बाबा झाल्याचं कळताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तसंच नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या मुलीला खुपसारे आशीर्वाद दिलेत.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2021 साली लग्न केलं. दोघेही 11 वर्ष एकमेकांना डेट करत होते. राजकुमार आणि पत्रलेखा यांना चंदीगडमध्ये शाही थाटात लग्न केलं होतं. त्यांची पहिली भेट 2010 साली झाली होती. 2014 साली आलेल्या सिटीलाइट्स या सिनेमात ते एकत्र दिसले होते.
advertisement
अभिनेत्री पत्रलेखा प्रेग्नंसी दरम्यान तिचं रुटीन चाहत्यांबरोबर शेअर करत होती. तिने बेबी बंपसोबतचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना पत्रलेखाने प्रेग्नंसीसाठी एग्ज फ्रीज केल्याचं सांगितलं होतं. एग्ज फ्रीज करण्यापेक्षा नॅशरल प्रेग्नंसी कधीही चांगली आहे, असा सल्ला तिने चाहत्यांना दिला होता. पत्रलेखाला एग्ज फ्रीज ते प्रेग्नंसी दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला असंही तिने सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडमधून सकाळी सकाळी Good News, अभिनेता राजकुमार राव झाला बाबा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement