Ramesh Pardeshi: '...म्हणून राज ठाकरेंची साथ सोडली', भाजपमध्ये जाताच पिट्या भाईचा प्रहार, राज ठाकरेंवर पलटवार

Last Updated:

Ramesh Pardeshi : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रमेश परदेशी यांनी मनसे सोडण्याचे कारण सांगितले आहे. याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंवर प्रहार केला.

News18
News18
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चेहरा, 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता रमेश परदेशी यांच्या एका राजकीय निर्णयाने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी थेट राज ठाकरे यांच्या पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत, लगेचच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रमेश परदेशी यांनी मनसे सोडण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पदाधिकारी आढावा बैठकीत झाला. आगामी निवडणुकांमध्ये कामात दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे संतापले होते. याचवेळी त्यांनी रमेश परदेशींना थेट विचारणा केली. राज ठाकरे म्हणाले, "तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा." एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट सल्ला राज ठाकरेंनी दिल्यानंतर, बैठकीत थोडा तणाव निर्माण झाला होता.
advertisement

रमेश परदेशी यांनी का सोडली मनसे?

राज ठाकरेंच्या या शब्दांमुळे रमेश परदेशी यांनी तातडीने आपला मार्ग बदलला. त्यांनी लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला आणि सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत 'राष्ट्र प्रथम' ही आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रमेश परदेशी यांनी आपले मत मांडले, "मी लहानपणापासून संघाचा सदस्य आहे. हा प्रश्न संस्काराचा आहे. संघ माझे संस्कार आहे आणि संस्काराने सांगितले की तू सोबत असला पाहिजेस."
advertisement

कलाकारांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश

परदेशी पुढे म्हणाले, "कलाकारांना न्याय देण्यासाठी आणि माझ्यावर जे संघाचे संस्कार आहेत, यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मराठी सिनेमाला मदत करायची असेल तर व्यापक व्यासपीठ असले पाहिजे. मी कधीच लपवले नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे. राज ठाकरे कलाकारांसोबत उभेच राहतात, पण अनेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे." परदेशी यांच्या या निर्णयामुळे कलाकार आणि राजकारणी या दोन्ही वर्गामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ramesh Pardeshi: '...म्हणून राज ठाकरेंची साथ सोडली', भाजपमध्ये जाताच पिट्या भाईचा प्रहार, राज ठाकरेंवर पलटवार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement