आधी म्हणाला, 'रामायण'साठी दारू, सिगारेट, नॉन-व्हेज सोडलं, आता मटणावर ताव मारताना दिसला रणबीर कपूर, होतोय ट्रोल

Last Updated:

Ranbir Kapoor : रणबीर कपूर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नॉन व्हेज खातानाच्या त्याच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.

News18
News18
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरने 'रामायण' या चित्रपटासाठी मासांहार सोडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटात रणबीर रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी रणबीर सात्त्विक जीवनशैली पाळत असल्याचे म्हटले जात होते. दुसरीकडे त्याने धूम्रपान सोडलं असल्याचीही चर्चा आहे. रणबीर सध्या शिस्तबद्ध आयुष्य जगत असल्याचं समोर आलं होतं. त्याचे ध्यान आणि व्यायाम करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता रणबीर मटन खाताना दिसला असल्याने नेटकरी त्याला चांगलच ट्रोल करत आहेत. 'रामायण'साठी नॉन व्हेज सोडलं होतं? मग पुढे काय झालं? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
रणबीर कपूर ट्रोल
रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर नॉन व्हेज खाताना दिसत आहे. रणबीरचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डायनिंग विथ द कपूर्स' या डॉक्युमेंट्रीमधील आहे. या रणबीरचं संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करताना दिसत आहेत. तसेच राज कपूर यांच्या आठवणींनादेखील यावेळी उजाळा देण्यात आला.
advertisement
नॉन व्हेज खाणं रणबीर कपूरला पडलंय भारी
'डायनिंग विथ द कपूर्स'च्या व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीरची मावस बहीण रीमा जैनचा मुलगा अरमान जैन फिश करी, भात आणि मटण हे पदार्थ संपूर्ण कपूर कुटुंबाला जेवणात वाढतो. रणबीरसोबत नीतू कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैन आणि सैफ अली खानदेखील दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. काही नेटकरी म्हणत आहेत की रणबीरने चित्रपटासाठी केलेले बदल हे फक्त पब्लिसिटी स्टंट होते.
advertisement
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"रणबीरच्या पीआर टीमने दावा केला होता की त्याने नॉन व्हेज सोडले आहे. रामायण या चित्रपटात तो प्रभू श्री रामा ही भूमिका साकारत आहे. त्यांचा सन्मान म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. पण आता काही महिन्यांतच रणबीर कपूर फिश करी आणि मटण खाताना दिसूम आला आहे.
advertisement
रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट दोन भागांत रिलीज होणार आहे. चित्रपटात सई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. तर रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. 'रामायण' हा देशातला आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीत तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी म्हणाला, 'रामायण'साठी दारू, सिगारेट, नॉन-व्हेज सोडलं, आता मटणावर ताव मारताना दिसला रणबीर कपूर, होतोय ट्रोल
Next Article
advertisement
Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

View All
advertisement