आलियाला टक्कर देणार नवीन 'कपूर'? कोण आहे लाइमलाइटमध्ये आलेली ही समारा, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री नीतू कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिच्याबरोबर एक मुलगी दिसत आहे. याआधीही ती अभिनेता रणबीर कपूरबरोबर दिसली होती.
मुंबई : बॉलिवूडमधील कपूर फॅमिलीतील नवीन पिढी इंडस्ट्रीत रुळतेय. इथून पुढे आता रणबीर आणि आलियाची मुलगी राहा कपूर हिच्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. पण ती मोठी होईपर्यंत अनेक वर्ष आहेत. त्याआधीच थेट आलियाला टक्कर देण्यासाठी नवीन कपूर इंडस्ट्रीत येणार आहे असं दिसतंय. अभिनेत्री नीतू कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिच्याबरोबर एक मुलगी दिसत आहे. याआधीही ती अभिनेता रणबीर कपूरबरोबर दिसली होती. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिला पाहिल्यानंतर ही आलियाला टक्कर देणार की काय असं दिसतंय. कोण आहे ही नवी कपूर?
विरल भयानीवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर एअरपोर्टमधून बाहेर पडून कारमध्ये बसण्यासाठी जात आहेत. तेवढ्यात त्यांना पापाराझी घेरतात. नीतू कपूरच्या मागून एक मुलगी बाहेर येते. ब्लॅक कलरचा टॉप आणि जिन्स वेअर केलेली, चेहऱ्यावर चकाकी आणि मोकळे केस असा लुक असलेली मुलगी पापाराझींसमोर येते. पापाराझींना पाहताच ती हसू लागते. त्यांच्याशी गप्पा मारते. तिने पापाराझींना तुमचा दिवस कसा केला असंही विचारलं. ती पापाराझींना फोटो देण्यासाठी पोझेसही देत होती.
advertisement
कोण आहे समारा साहनी ?
व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी नीतू कपूर यांची नात आहे. म्हणजेच रिद्धिमा कपूरची मुलगी आणि रणबीर-आलिया यांची भाची आहे. समारा साहनी असं तिचं नाव आहे. ती मामा रणबीर कपूरसारखीच दिसतेय. काही महिन्यांआधीच जेह अली खानच्या बर्थडे पार्टीसाठी समारा स्पॉट झाली होती. तिची पापाराझींना फोटो देण्याची क्रेझ पाहून सगळेच शॉक झालेले.
advertisement
advertisement
एका जुन्या मुलाखतीत बोलताना रिद्धिमाने तिची मुलगी समारा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कन्फर्म केलं होतं. ती म्हणाली होती, सॅम, 110% ती सिनेमात दिसणार. आमच्या घरातला प्रत्येक जण इंडस्ट्रीत येणार कारण ते त्यांच्या रक्तात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 8:01 AM IST