रणवीर सिंह ते नवाजुद्दीन सिद्दीकी, या सेलिब्रिटींनी केलाय One Night Stand, स्वत:च केला खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
One Night Stands : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी वन नाइट स्टँड केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
Bollywood Celebrity One Night Stands : बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. काही बॉलिवूडकरांना आपलं आयुष्य प्रायव्हेट ठेवायला आवडतं तर काही मोकळेपणाने भाष्य करतात. पण काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी तर बेडरुम सीक्रेटदेखील शेअर केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी ते कृष्णा अभिषेकपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी वन नाईट स्टँडबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
महीप कपूर - संजय कपूर (Maheep Kapoor Sanjay Kapoor) : महीप कपूर आणि संजय कपूर हे बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं आहे. त्यांची लव्हस्टोरी खूप वेगळी आहे. महीपने रजनीला दिलेल्या मुलाखतीत संजय कपूरसोबतच्या लव्हस्टोरी बाबत भाष्य केलं. महीप म्हणाला होता,"आमची लव्हस्टोरी खूप साधी आहे. ज्या व्यक्तीसोबत मी वन नाइट स्टँड केलंय तिच्यासोबत माझं लग्न होईल असा मी कधी विचार केला नव्हता.
advertisement
कृष्णा अभिषेक - कश्मीरा शाह (Krushna Abhishek Kashmera Shah) : कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या रिलेशनची सुरुवात वन नाइट स्टँडपासून झाली होती. कृष्णा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, माझी आणि कश्मीराची पहिली भेट जयपुरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी आमची चांगली मैत्री झाली. कश्मीराने डिनरसाठी कृष्णाला तिच्या रुममध्ये बोलावलं आणि तिथेट वन नाइट स्टँडपासून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.
advertisement
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddhin Siddiqui) : नवाजुद्दीन आपल्या इंटेंस भूमिकेसाठी ओळखला जातो. एका पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीसोबत त्यांनी वन नाइट स्टँड केल्याचंही या पुस्तकात मेंशन करण्यात आलं आहे.
advertisement
रणवीर सिंह (Ranveer Singh) : रणवीर सिंह करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी झाला असताना त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यावेळी रणवीर म्हणाला की, वयाच्या 12 व्या वर्षी मी वर्जिनीटी गमावली. तसेच अनेक वन नाइट स्टँड झाल्याचंही रणवीर यावेळी म्हणाला होता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रणवीर सिंह ते नवाजुद्दीन सिद्दीकी, या सेलिब्रिटींनी केलाय One Night Stand, स्वत:च केला खुलासा










