'नटरंग'नंतर 15 वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांची 'फुलवरा' प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट पोस्टर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Phulwara New Movie : 15 वर्षांनी नटरंगची लोकप्रियता कमी झालेली नाही. नटरंगच्या अपार यशानंतर तब्बल 15 वर्षांनी रवी जाधव एक नवा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
2010 साली आलेल्या नटरंग या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रवी जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या नटरंगची कथा आणि उत्कृष्ट गाणी प्रेक्षकांना भावली. नटरंग या तमाशापटातून त्यांनी एक वेगली कथा प्रेक्षकांसमोर मांडली ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आज 15 वर्षांनी नटरंगची लोकप्रियता कमी झालेली नाही. नटरंगच्या अपार यशानंतर तब्बल 15 वर्षांनी रवी जाधव एक नवा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. 'फुलवरा' असं सिनेमाचं नाव असून सिनेमाचं पहिलं पोस्टर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर फुलवरा सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रवी जाधव यांच्या दिग्दर्शित या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत असलेल्या फोक आख्यानचे संगीच कारभारी, लेखक आणि निवेदक यांची वर्णी सिनेमात लागली आहे. 'द फोक आख्यान' ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारे आणि हर्ष - विजय या तरुण संगीतकार जोडीनं सिनेमाला संगीत दिलं आहे.
advertisement
फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, "तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावरच आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. "
advertisement
रवी जाधव पुढे म्हणाले, "याचदरम्यान मी 'द फोक आख्यान' हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला , परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे. त्यांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच फुलवरा चित्रपटाची गोष्ट तयार झाली."
advertisement
advertisement
"द फोक आख्यान ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास थक्क करणारा आहे आणि हर्ष - विजय या तरुण जोडगोळीला असलेली लोकसंगीताची जाण ही कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलवराची गोष्ट तयार झाली. अशा प्रकारची गोष्ट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी झी स्टुडिओजपेक्षा उत्तम असं दुसरं माध्यम नाही त्यामुळे नटरंग नंतर पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो आहोत", असंही रवी जाधव यांनी सांगितलं.
advertisement
'फुलवरा' चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांची आहे. तर सिनेमाची कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांची आहे. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान सिनेमाचं पहिलं पोस्टर बघून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 8:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'नटरंग'नंतर 15 वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांची 'फुलवरा' प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट पोस्टर