Rhea Chakraborthy: सुशांतची आत्महत्या अन् इंडस्ट्रीतून बॉयकॉट, 7 वर्षांनी रिया चक्रवर्तीचं धमाकेदार कमबॅक, OTT वर करणार डेब्यू
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतमुळे प्रकाशझोतात आलेली रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया चक्रवर्ती फार मोठ्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतमुळे प्रकाशझोतात आलेली रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया चक्रवर्ती फार मोठ्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये क्लिनचिट मिळाल्यानंतर रिया आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतली आहे. जेव्हा रियावर फक्त आरोप लावले गेले, तेव्हा तिला फार ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नेटकरी ट्रोल करायचे. पण आता अभिनेत्रीची सर्व आरोपांमधून मुक्तता झालेली आहे.
नेटफ्लिक्सकडून 2026 या वर्षात रिलीज होणाऱ्या वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातीलच एका वेबसीरिजमधून रिया चक्रवर्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फॅमिली बिझनेस' असं या वेबसीरिजचं नाव असून रिया चक्रवर्तीसोबत प्रमुख भूमिकेत अनिल कपूर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांना एक कॉर्पोरेट ड्रामा पाहायला मिळणार असून एका फॅमिलीची आणि त्यांच्या फॅमिली बिझनेसची स्टोरी पाहायला मिळणार आहे. कालच्या इव्हेंटमध्ये रियानेही इतर स्टारकास्टसोबत हजेरी लावली होती. रिया फार मोठ्या ब्रेकनंतर आणि अनेक वाद झेलून पुन्हा तिच्या करियरकडे बघत असल्यामुळे चाहते तिचे कौतुक करत आहे.
advertisement
सीरिजच्या स्टारकास्टमध्ये रियाला पाहून नेटकऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. पाच वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला अभिनयात पाहिल्यानंतर एक चाहते म्हणतो, "रिया अखेर अभिनयात परतलीये, हे पाहून खूप आनंद झाला." आणखी एक युजर म्हणतो, "देर आये दुरुस्त आये... अभिनंदन रिया." तर आणखी एक युजर म्हणतो, "रियाचे फिल्मी करियर धैर्याचे प्रदर्शन करतो." या सीरिजमध्ये अनिल कपूर, विजय वर्मा, रिया चक्रवर्तीसोबतच नेहा धुपिया, आकाश खुराना, नंदिश संधू, रायमा सेन, ध्रुव सेहगल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rhea Chakraborthy: सुशांतची आत्महत्या अन् इंडस्ट्रीतून बॉयकॉट, 7 वर्षांनी रिया चक्रवर्तीचं धमाकेदार कमबॅक, OTT वर करणार डेब्यू








