'चित्रपट करेन पण...', 'वाराणसी'साठी प्रियांका चोप्राने SS राजामौलींना घातली विचित्र अट; महेश बाबूचा झालेला संताप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priyanka Chopra In Varanasi: राजामौलींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडे काम मागण्याऐवजी प्रियांकाने त्यांच्यासमोर एक अजब अट ठेवली होती, जिचा खुलासा खुद्द प्रियांकानेच एका मुलाखतीत केला आहे.
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा तब्बल सात वर्षांनंतर भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'देसी गर्ल'चं हे कमबॅक साध्यासुध्या चित्रपटातून नाही, तर ज्यांच्या नावावर 'आरआरआर' आणि 'बाहुबली'सारखे जागतिक विक्रम आहेत, त्या एसएस राजामौली यांच्या 'वाराणसी' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
प्रियांका म्हणाली, "मी सहा-सात वर्षांपासून कोणत्याही भारतीय चित्रपटात काम केलं नव्हतं. जेव्हा राजामौली सरांचा फोन आला आणि ते मला भूमिकेबद्दल सांगू लागले, तेव्हा मी त्यांना थांबवलं आणि म्हटलं, सर माझी एकच विनंती आहे, प्लीज माझ्याकडून या चित्रपटात डान्स करून घ्या. कारण इतकी वर्ष झाली मी कॅमेऱ्यासमोर मनसोक्त डान्सच केलेला नाही."
advertisement
प्रियांकाच्या या अटीचा फटका मात्र दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला बसला आहे. प्रियांकासोबत बोलताना महेश बाबू हसून म्हणाला, "प्रियांकाच्या या एका हट्टापायी राजामौली सरांनी इतका कठीण डान्स बसवलाय की माझी अवस्था बिकट झाली आहे. मी तिला म्हणालो सुद्धा की, हे फक्त तुझ्यामुळे घडतंय. तुझ्या डान्सच्या आवडीमुळे मलाही आता इतकी मेहनत करावी लागतेय!"
advertisement
advertisement
advertisement










