advertisement

247 तोळं सोनं, हिऱ्याचे दागिने आणि 65 लाख रोख, 22 मिनिटांमध्ये 4 कोटी गायब, अखेरीस रजनीकांत पोलिसांना सापडला

Last Updated:

रजनीकांत नावाच्या चोराला महागडी घड्याळे, कपडे, बोट, हॉटेलिंग आणि पर्यटनाचा छंद होता. तसंच चोरीचा पैसा तो शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करत होता

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर :  एखाद्या सीरिजला लाजवेल अशी घटना नागपूरमध्ये घडली होती. नागपुरातील एका व्यावसायिकाचा घरावर दरोडा टाकून तब्बल चार कोटींचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. चोरांनी अवघ्या 22 मिनिटांमध्ये 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, रत्न, हार असा ४ कोटींचा मुद्देमाल लंपास केला होता. अखेरीस नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला दोन चोरट्यांना अटक करण्यात  यश आलं आहे. या दोन्ही चोरांवर या आधी २२ गुन्हे दाखल होते.
advertisement
पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, या धाडसी दरोड्याप्रकरणी  रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे या दोन चोरांना अटक करण्यात आली आहे.  नागपूरच्या राजनगर परिसरात राहणाऱ्या बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरी 20 जानेवारीला मुलाचा साखरपुडा होता. साखरपुडा असल्याने नय्यर कुटुंबीय कळमेश्वर तालुक्यात गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत स्वयंपाक घरातील ग्रील तोडून घरात प्रवेश केला. बलजिंदर सिंग यांच्या आईच्या खोलीत प्रवेश करून 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, रत्न, हार लंपास केले होते.
advertisement
65 लाखांची रोकडही चोरली
बलजिंदर सिंग यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप व्यवसायातील 65 लाख रोख रुपये देखील घरी होते. त्यांच्या भावाच्या बेडरूम मधून चोरट्यांनी रोकड देखील लंपास केली होती. नय्यर यांचे कुटुंबीय पहाटे 3 च्या सुमारास घरी परत आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
advertisement
असे सापडले चोर
केवळ 22 मिनिटांत चोरट्यांनी चार कोटींच्या मुद्देमालावर हात साफ केला होता, काही सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसले होते पण ते स्पष्ट नव्हते. त्यामुळे चोरट्यांचा शोध लावण्याचं आव्हान गुन्हे शाखा पोलिसांसमोर होतं. सीसीटीव्ही फुटेज तपासात गेल्या वर्षी पकडलेल्या चोरावर पोलिसांचा संशय आला, त्यांची शरीरयष्टी भंडारा जिल्ह्यातील सराईत चोर चानोरे आणि उरकुडे यांचेशी जुळत होती. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी या दोघांच्याही घरावर धाड मारली तिथे चोरीचे 32 लाख 97 लाख रोख,122 तोळे सोन्याचे,197 ग्राम हिऱ्याचे दागिने सापडले होते, त्यामुळे पोलिसांना खात्री पटली की हेच दोघे चोर आहे.
advertisement
पुण्यातून दोघांना पकडलं
रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे हे दोघेही फरार होते. मात्र दोघेही आरोपी मुंबई,अहमदाबाद, पुणे असे एका शहरातून दुसऱ्या शहरात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.अखेर गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना पुण्याच्या भोसरी येथील एका लॉज मधून अटक केली.
रेकी करून घरफोडी करण्यात पटाईत असलेल्या या दोन्ही आरोपींनी यापूर्वी नागपूर, भंडारा, छत्तीसगढमधील भिलाई,राजनांदगाव इथंही घरफोड्या केल्या होत्या. त्यांच्यावर यापूर्वी 22 गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी उच्चभ्रू लोकांची घरे टार्गेट करायचे. मोठा माल हाती लागल्यावर अहमदाबाद मुंबई अशा मोठ्या शहरात जाऊन आलिशान जीवनशैली जगायचे.
advertisement
चोरीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा
यातला रजनीकांत नावाच्या चोराला महागडी घड्याळे, कपडे, बोट, हॉटेलिंग आणि पर्यटनाचा छंद होता. तसंच चोरीचा पैसा तो शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 3 कोटींपेक्षा अधिकच्या मुद्देमाला जप्त  केलाा असून अधिक तपास नागपूर पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
247 तोळं सोनं, हिऱ्याचे दागिने आणि 65 लाख रोख, 22 मिनिटांमध्ये 4 कोटी गायब, अखेरीस रजनीकांत पोलिसांना सापडला
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement