Rihanna : आधी 2 मुलं, 9 महिन्यात पुन्हा प्रेग्नंट झाली फेमस सिंगर; बेबी बंपचे PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rihanna Pregnant : पॉप साँग्सची क्वीन रिहाना पुन्हा एकदा आई होणार आहे. रिहानावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
Rihanna : लोकप्रिय सुपरस्टार पॉप सिंगर आणि अभिनेत्री रिहानाच्या गाण्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. बारबाडोसच्या रिहानाला आज कोण ओळखत नाही? अलीकडेच तिने जाहीर केले होते की ती तिसऱ्यांदा आई होणार आहे. यापूर्वी रिहानाने दोन मुलांना जन्म दिला आहे. नुकतच रिहानाने तिचा जोडीदार रॅपर A$AP Rocky सोबत केलेल्या एका कृतीद्वारे हिंट दिली आहे की, ज्यामुळे चाहते अंदाज लावत आहेत की त्यांच्या घरी तिसरं बाळ येणार आहे. रिहानाच्या नव्या इंस्टा पोस्टमुळे हा अंदाज अधिक स्पष्ट वाटू लागला आहे. या पोस्टनंतर रिहानावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रिहानाने तिच्या इंस्टाग्रामवर HOMMEGIRLS VOLUME 14 चं कव्हर पेज शेअर केलं आहे. याफोटोमध्ये ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे. आपला फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – ‘HOMMEGIRLS VOLUME 14 माझी नवीन फॅशन...’ ही पोस्ट पाहिल्यानंतर रिहानाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रिहानाची ही पोस्ट मुलींसाठी असलेल्या फॅशन मॅगझीनसाठी आहे. याच हिंटवरून तिचे चाहते अंदाज लावत आहेत की रिहानाचं तिसरं बाळ मुलगी असेल. फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं,"आम्हाला एक बेबी गर्ल मिळणार आहे फेंटी". रिहानाच्या पोस्टवर अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स येत आहेत.
advertisement
advertisement
रिहाना आणि तिचे पती A$AP Rocky यांनी अनेकदा मुलगी होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे लॉस एंजेलिसमध्ये एका चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान रिहानाने सांगितले की, तिचे दोन्ही मुलं — RZA (3 वर्षांचा) आणि Riot (2 वर्षांचा) लवकरच मोठे भाऊ होणार असल्याने खूप आनंदी आहेत. रिहानाला नेहमीच आपल्याला एक मुलगी व्हावी अशी इच्छा होती. काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिस येथील एका दुकानाबाहेरही रिहाना स्पॉट झाली होती. त्यावेळी तिच्या साधेपणा दाखविणाऱ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rihanna : आधी 2 मुलं, 9 महिन्यात पुन्हा प्रेग्नंट झाली फेमस सिंगर; बेबी बंपचे PHOTO