2 तास 45 मिनिटांचा ब्लॉकबस्टर चित्रपट! Kantara Chapter 1 ने पार केला 500 कोटींचा टप्पा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kantara Chapter 1 Box Office Collection : बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीसाठी हे वर्ष खूप खास ठरलं आहे. 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने रिलीजच्या 17 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Kantara Chapter 1 : 'सैयारा', 'छावा' पासून ते 'महावतार नरसिंह' पर्यंत 2025 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करून इतिहास रचला. याच वर्षी प्रदर्शित झालेला तो धमाकेदार चित्रपट जो गेल्या 17 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 2 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आणि आपल्या कथेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटाने अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून आपले नाव चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कोरले आहे. ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाने रिलीजच्या 17 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला जमवला आहे.
2025 चा ब्लॉकबस्टर चित्रपट
2025 मध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, पण मोजकेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आणि त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना अपेक्षेपेक्षा हजारपट अधिक आनंद मिळाला. आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, त्याची कथा, प्रत्येक सीन, लोकगीतं, नृत्य आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांनी खूपच पसंत केला आहे. विशेषतः पॅन इंडिया रिलीजनंतर या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळीच ओळख मिळवून दिली.
advertisement
कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चैप्टर 1' प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले आहेत, पण प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची वेगळीच क्रेझ पाहायला मिळतेय. हा एक पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये निसर्ग आणि श्रद्धेच्या रक्षणाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिकेत आहे आणि त्याच्यासोबत जयराम, रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवय्या यांसारखे कलाकारही झळकत आहेत. हा चित्रपट 2022 मधील ब्लॉकबस्टर 'कांतारा'चा प्रीक्वेल आहे, जो आपल्या नव्या कथेमुळे प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 2 तास 45 मिनिटांचा 'कांतारा चैप्टर 1' ला IMDb वर 8.6 रेटिंग मिळालं आहे.
advertisement
'कांतारा चॅप्टर 1'ने किती कमाई केली?
view comments'कांतारा चैप्टर 1' ने पहिल्या आठवड्यात 337.4 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 147.85 कोटी रुपये कमाई केली. आता तिसऱ्या शनिवारच्या दिवशी या चित्रपटाने देशभरात 21 कोटी रुपये कमावले. त्यामुळे एकूण कमाई आता 506.25 कोटी रुपये झाली आहे. यासह हा चित्रपट 500 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. ओपनिंग दिवशी 61.85 कोटी रुपये कमावून हा चित्रपट 2025 मधील टॉप 10 ओपनिंग चित्रपटांपैकी एक ठरला आहे. हा चित्रपट आता दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे. दिवाळीत या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 10:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 तास 45 मिनिटांचा ब्लॉकबस्टर चित्रपट! Kantara Chapter 1 ने पार केला 500 कोटींचा टप्पा