Pune News : निवडणुकीआधी पुण्यात खळबळ, दोन सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, कारण काय?

Last Updated:

Pune News : निवडणुकीआधी पुण्यात खळबळ उडाली आहे. दोन सहाय्यक आयुक्तांची अचानक उचलबांगडी करण्यात आली. चला तर जाणून घ्या या बाबतचे सविस्तर कारण.

News18
News18
पुणे : पुण्यातून एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. परिसरातील गंभीर असुविधा पाहून संतप्त महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई केली ज्यात वाघोली, शेवाळवाडी, मांजरी भागातील सहाय्यक आयुक्तांसह तीन उपअभियंते बदली करण्यात आली असून तर तीन अधिकाऱ्यांना थेट निलंबनाचे आदेश दिलेले आहेत.
कारण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी आणि मांजरी , वाघोली या परिसराचा जेव्हा महापालिका आयुक्त आढावा घेत होते त्याच दरम्यान वाघोलीमध्ये नागरिकांनी आयुक्ताना भेटून थेट महापालिकेच्या खराब स्थितीचा जाब बिचारला. त्यानंतर नागरिकांच्या समस्या ऐकून आणि प्रत्यक्षात पाहणी केली असता आयुक्त नवल किशोर राम संतप्त झाले आणि त्यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
advertisement
शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील पाहणी दरम्यान अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, सांडपाण्याचा प्रवाह आणि अतिक्रमण या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना झाला. या निष्क्रियतेमुळे हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांची तडकाफडकी बदली केली गेली आहे. तसेच मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांना निलंबित केले आहे.
advertisement
दोन दिवसांपूर्वी वाघोली भागात झालेल्या पाहणी दरम्यान रस्त्यावर सांडपाणी वाहताना दिसले. मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आढळल्याने सहायक आयुक्त शीतल वाकडे, उपअभियंता विनायक शिंदे आणि गणेश पूरम यांचीही बदली करण्यात आली. आयुक्त राम यांनी स्पष्ट केले की, शेवाळवाडी, मांजरी आणि वाघोली भागातील कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
advertisement
पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजक आणि रस्तेही घाण आणि कचऱ्याने भरलेले होते. आयुक्तांनी संबंधित विभागांना तत्काळ स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील अस्वच्छता, सांडपाणी, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या समस्यांवर अधिकारी प्रभावीपणे काम करत नसतील तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
महापालिकेच्या कामकाजातील निष्काळजीपणा आता सहन केला जाणार नाही, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेत स्थान मिळणार नाही. खात्यांतर्गत चौकशीनंतर अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर बदली आणि निलंबनाची कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : निवडणुकीआधी पुण्यात खळबळ, दोन सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, कारण काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement