Shiv Sena UBT BJP : आऊटगोईंग सुरू असलेल्या ठाकरे गटात आता भाजपमधून इनकमिंग, नाशिकमध्ये मोठी घडामोड

Last Updated:

Nashik Civic Polls : ठाकरे गटाचे स्थानिक पातळीवरील अनेक महत्त्वाचे नेते भाजप, शिंदे गटात गेले होते. त्यानंतर ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे.

आऊटगोईंगनंतर आता इनकमिंग! भाजप नेते ठाकरे गटात; नाशिकमध्ये राजकीय धक्का
आऊटगोईंगनंतर आता इनकमिंग! भाजप नेते ठाकरे गटात; नाशिकमध्ये राजकीय धक्का
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात मोठी राजकीय वळण आणणारी घडामोड घडत आहे. आतापर्यंत आउटगोईंग सुरू असलेल्या शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पातळीवरील अनेक महत्त्वाचे नेते भाजप, शिंदे गटात गेले होते. त्यानंतर ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपचे माजी नगरसेविका आता कमळ सोडून मशाल हाती घेणार आहेत.
advertisement
आतापर्यंत इनकमिंग सुरू असलेल्या भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा होती. आता भाजपमधूनही काहीजण बाहेर पडत आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड हे उद्या अधिकृतपणे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रवेश थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
advertisement
हा प्रसंग नाशिक भाजपसाठी पहिला मोठा धक्का मानला जात आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातून अनेक नेते बाहेर पडत होते, त्यामुळे पक्षात गळतीचे वातावरण होते. मात्र, पहिल्यांदाच नाशिकातइन्कमिंग’ होत असल्याने शिवसेना ठाकरे गटासाठी हा राजकीय दिलासा ठरू शकतो.
advertisement

>> का महत्त्वाचा आहे हा प्रवेश?

भाजपची माजी नगरसेविका थेट ठाकरे गटात येत असल्याने स्थानिक पातळीवर भाजपला काहीसा धक्का आहे. तर, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नवी एन्ट्री ठाकरे गटासाठी मजबूत आधार ठरू शकते. शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही दिवसांत झालेल्या गळतीनंतर आता पहिल्यांदा नव्या नेतृत्वाचा प्रवेश होणे पक्षासाठी महत्त्वाची बाब समजली जात आहे.
advertisement

>> हेमंत गायकवाडांची घरवापसी...

हेमंत गायकवाड हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड मनसेतून नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी दिली होती. त्यावेळी संगीता गायकवाड निवडून आल्या व नगरसेविका झाल्या. आता हे दोघेही पती पत्नी पुन्हा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करत आहेत. गायकवाड दाम्पत्याची घरवापसी ठाकरे गटाला किती फायदेशीर ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT BJP : आऊटगोईंग सुरू असलेल्या ठाकरे गटात आता भाजपमधून इनकमिंग, नाशिकमध्ये मोठी घडामोड
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement