IND vs PAK: सुरूवात कुठं झाली? वैभव सूर्यवंशी नाही तर आयुष म्हात्रेने घेतला होता बॉलरशी पंगा; मैदानात हायव्होल्टेज राडा, पाहा Video

Last Updated:

Ayush Mhatre Video Viral : सिनियर खेळाडूंच्या पायावर पाय ठेऊन जुनियर खेळाडूंनी देखील पाकिस्तानला इंगा दाखवला आहे. टीम इंडियाच्या कॅप्टनने देखील पाकड्यांना धडा शिकवला.

Ayush Mhatre Angry Engages In Heated Conversation
Ayush Mhatre Angry Engages In Heated Conversation
Ayush Mhatre Heated Conversation : अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला असून पाकिस्तानने 191 रन्सनी विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. पाकिस्तानने हा विजय मिळवला असला तरी, त्यांच्या खेळाडूंनी मैदानावर केलेल्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाला. भारताचा वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन आयुष म्हात्रे यांनी देखील पाकिस्तानला जागा दाखवली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयुषचं मागे वळून सडेतोड उत्तर

टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना पाकिस्तानी खेळाडूंनी वारंवार स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जेव्हा आयुष म्हात्रे फक्त 2 रन्सवर आऊट झाला. त्यावेळी तो आऊट होऊन पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा एका पाकिस्तानी खेळाडूने त्याच्यावर कमेंट अन् शिवीगाळ केली. यावर आयुषने मागे वळून सडेतोड उत्तर दिल्याने दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement

पाकिस्तानी बॉलरला जागा दाखवली

आयुष म्हात्रे मैदानातून बाहेर गेल्यावर काही वेळाने वैभव सूर्यवंशीला देखील मैदान सोडावं लागलं. त्यावेळी देखील पाकिस्तानने भारतीय खेळाडूंना डिवचलं. त्यावेळी वैभव सूर्यवंशीने देखील पाकिस्तानी बॉलरला जागा दाखवली होती.
advertisement

संपूर्ण टीम अवघ्या 156 रन्सवर ऑल आऊट

या हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानच्या समीर मिन्हासने झंझावाती बॅटिंग करत 113 बॉल्समध्ये 172 रन्सची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 17 फोर आणि 9 सिक्स लगावत पाकिस्तानला 347 रन्सचा डोंगर उभा करून दिला. 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या मिन्हासने भारतीय बॉलर्सची दाणादाण उडवली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली आणि संपूर्ण टीम अवघ्या 156 रन्सवर ऑल आऊट झाली.
advertisement

आशिया कप जिंकण्याचे स्वप्न भंगलं

टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीने 10 बॉल्समध्ये 26 रन्स करून वेगवान सुरुवात केली होती, मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. मिडल ऑर्डरमध्ये दीपेश देवेन्द्रनने सर्वाधिक 36 रन्स केले, परंतु इतर कोणत्याही बॅट्समनला 20 रन्सचा आकडा पार करता आला नाही. कॅप्टन शुभमन गिलच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या युवा खेळाडूंना पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर टिकता आले नाही आणि आशिया कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK: सुरूवात कुठं झाली? वैभव सूर्यवंशी नाही तर आयुष म्हात्रेने घेतला होता बॉलरशी पंगा; मैदानात हायव्होल्टेज राडा, पाहा Video
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement