दिग्दर्शकाने स्क्रिप्टच दिली नाही, तरी 23 दिवसांत पूर्ण झाला हा मराठी सिनेमा, पण कसा?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कलाकाराला चांगला अभिनय करण्यासाठी चांगल्या स्क्रिप्टचीही गरज असते. पण असा एक मराठी सिनेमा ज्यात कलाकारांना सिनेमाची स्क्रिप्टच मिळाली नाही.
सिनेमा करणं ही सोपी गोष्ट नाही. एका सिनेमामागे अनेक लोक, कलाकार आणि अनेक गोष्टी समाविष्ट असतात. सिनेमा करायचा म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा सगळ्यांचीच मेहनत असते. कलाकाराला चांगला अभिनय करण्यासाठी चांगल्या स्क्रिप्टचीही गरज असते. पण असा एक मराठी सिनेमा ज्यात कलाकारांना सिनेमाची स्क्रिप्टच मिळाली नाही.
'रुबाब' हा आगामी मराठी सिनेमाविषयी आपण बोलत आहोत. हा सिनेमा करताना हटके मेकिंग स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. सिनेमाच्या शूटिंगपूर्वी कलाकारांना संपूर्ण स्क्रिप्ट दिली जाते. मात्र 'रुबाब'च्या बाबतीत नेमकं उलट घडलं. स्क्रिप्ट तयार असूनही ती कलाकारांना ती देण्यातच आली नाही. स्क्रिप्ट नसताना कलाकारांनी सिनेमा शूट कसा केला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
( 2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, पुष्पा-दृश्यमपेक्षा खतरनाक; बजेटच्या दुप्पट केली कमाई )
'तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे' ही टॅगलाईन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलाकारांनी हातात स्क्रिप्ट नसताना तब्बल 23 दिवस विविध लोकेशन्सवर रिहर्सल आणि वर्कशॉप केले. मात्र या काळात त्यांना कोणतीही रिटन स्क्रिप्ट देण्यात आली नाही.
advertisement
शेखर बापू रणखांबे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी प्रत्येक सीन, संवाद आणि भावनिक प्रसंग कलाकारांना प्रत्यक्ष समजावून सांगितले. प्रसंगामागची भावना, पात्रांची मानसिकता आणि सीनची गरज यावर सविस्तर चर्चा केली जात होती. त्यामुळे कलाकारांनी संवाद पाठ करून नव्हे तर प्रसंग समजून अभिनय केला.

advertisement
या वेगळ्या पद्धतीमुळे सेटवर सतत संवाद, चर्चा आणि आयडियांची देवाणघेवाण सुरू होती. कलाकारांना त्यांच्या पात्रात खोलवर जाण्याची संधी मिळाली. याचा परिणाम अभिनय अधिक नैसर्गिक आणि जिवंत होण्यास मदत झाली.
या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर यांनी निर्मिती केली आहे. सिनेमात. संभाजी ससाणे आणि शितल पाटील ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा येत्या 6 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:44 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दिग्दर्शकाने स्क्रिप्टच दिली नाही, तरी 23 दिवसांत पूर्ण झाला हा मराठी सिनेमा, पण कसा?







