सचिन पिळगांवकर अन् ती 500 रुपयांची नोट... नव्या किस्स्यावरून महागुरू पुन्हा एकदा ट्रोल, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सचिन पिळगांवकर यांच्या ५०० रुपयांच्या भेटीच्या किस्स्यावर bakchhodddd इन्स्टाग्रामवर ट्रोलिंग सुरू असून सोशल मीडियावर चर्चेची लाट उसळली आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, अभिनेते, गायक आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलाखती आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहेत. नुकतंच उर्दू भाषेबद्दल केलेल्या एका विधानामुळे त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता असाच एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सचिन पिळगांवकर यांनी एका महिला चाहतीचा ५०० रुपयांच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे.
चाहती भेटली अन् 500 रुपये दिले!
सचिन पिळगांवकर यांनी INN न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका अविस्मरणीय भेटीबद्दल सांगत आहेत. सचिन म्हणाले, "मी बॅडमिंटन खेळून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून बाहेर पडत होतो. तेवढ्यात माझ्यासमोर ३५-४० वयोगटातील एक महिला आली. ती माझी खूप मोठी फॅन असल्याचे सांगू लागली. तिने माझे अनेक चित्रपट पाहिले होते."
advertisement
या भेटीच्या शेवटी त्या चाहतीने सचिन यांचे आभार मानले आणि ५०० रुपयांची एक नोट काढली. ती म्हणाली, "माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी दुसरं काही नाही, कृपया हे पैसे घ्या." सचिन यांनी ५०० रुपयांच्या या भेटीचा किस्सा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
advertisement
ट्रोलर्सना ट्रोल करायला मिळाला नवा विषय
सचिन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक गोष्ट सांगत असतानाही, सोशल मीडिया युजर्सनी मात्र ट्रोलिंगची संधी सोडली नाही. 'bakchhodddd' या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यावर हजारोंनी प्रतिक्रिया येत आहेत.
एका युझरने विचारले, "ही चर्चा उर्दूमध्ये झाली होती का?" तर दुसऱ्या युझरने थेट लिहिले, "५०० रुपये घ्या, पण आम्हाला अशा पद्धतीनं छळू नका." तर आणखी एका युझरने अशा मुलाखतींमुळेच मराठी कलाकार ट्रोल होतात, अशी खंत व्यक्त केली आहे.
advertisement
सचिन पिळगांवकर यांच्या या नव्या किस्स्याला मिळालेल्या या विचित्र प्रतिसादावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सचिन पिळगांवकर अन् ती 500 रुपयांची नोट... नव्या किस्स्यावरून महागुरू पुन्हा एकदा ट्रोल, VIDEO VIRAL