KKRजिंकताच शाहरुख खान ठणठणीत; बायकोला केलं Kiss,स्टेडिअम दिलेली सिग्नेचर पोझ व्हायरल

Last Updated:

केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखनच्या त्याची सिग्नेचर पोझ देत आनंद व्यक्त केला, पत्नी गौरी खान, लेक सुहाना, अब्राहम आणि आर्यन खान हे देखील स्टेडियमवर उपस्थित होते.

शाहरुख खान- केकेआर
शाहरुख खान- केकेआर
मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या कोलकाता नाइट राइडर्सने IPL2024ची ट्रॉफी आपल्या नावे केली. जुही चावला आणि शाहरुखच्या केकेआर टीमनं सनराइजेस हैद्राबादला हरवलं. केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखचा आनंद गगनात मावेनासा झाला. फक्त शाहरुखच नाही तर शाहरुखचं संपूर्ण कुटुंब स्टेडिअमवर आनंदानं नाचत होतं. शाहरुख खान सेमी फायनलवेळी रुग्णालयात दाखल झाला होता. तब्येत खराब असताना तो फायनल मॅच पाहण्यासाठी स्टेडअयमवर आला. टीम जिंकताच शाहरुखचं आजारपण कुठच्या कुठे पळून गेलं. शाहरुखच्या स्टेडिअमवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखनच्या त्याची सिग्नेचर पोझ देत आनंद व्यक्त केला, पत्नी गौरी खान, लेक सुहाना, अब्राहम आणि आर्यन खान हे देखील स्टेडिअमवर उपस्थित होते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, शाहरुन टीमवर भरभरुन प्रेम व्यक्त करत आहे. शाहरुखनं आनंदाच्या भरात लेक सुहानाला मिठी मारली. सुहाना देखील यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर शाहरुखनं आनंदाच्या भरात पत्नी गौरी खानला सर्वांसमोर किस देखील केलं.
advertisement
केकेआरनं ट्रॉफी मिळवल्यानंतर शाहरुखनं संपूर्ण टीमबरोबर जल्लोष साजरा केला. हातात ट्रॉफी आणि टीमबरोबर शाहरुख फ्लाइंज किस करताना दिसला. दरम्यान फ्लाइंग किस यंदाच्या IPLमध्ये खूप चर्चेत आला. केकेआर आणि सनराइजेर्स हैद्राबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये हर्षित राणाने मयंक अग्रवालला आऊट केल्यानंतर फ्लाइंग किस केलं होतं. त्यानंतर BCCIनं फ्लाइंग किसवर बॅन घालण्यात आला होता. केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखनं तेच फ्लाइंग किस करत BCCIला चिडवल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
शाहरुख खान एक दिवस रुग्णालयात दाखल झाला. त्याला डिहायड्रेशनमुळे खूप त्रास झाला. रुग्णालयातून घरी आणि तिथून शाहरुख थेट चेन्नईमध्ये दाखल झाला. कोलकाता नाइट राइडर्स आणि सनराइजेस हैद्राबाद यांच्यातील फाइनल मॅचसाठी शाहरुख उपस्थित राहिला.
advertisement
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी देखील स्टेडिअमवर उपस्थित होती. शाहरुख खानचं संपूर्ण कुटुंब त्याचबरोबर लेक सुहानाची मैत्रीण अनन्या पांडे आणि शनाया पांडे देखील मॅच पाहण्यासाठी आल्या होत्या.
मराठी बातम्या/मनोरंजन/
KKRजिंकताच शाहरुख खान ठणठणीत; बायकोला केलं Kiss,स्टेडिअम दिलेली सिग्नेचर पोझ व्हायरल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement