'मला ट्रोल करण्यापेक्षा…' ठाण्यातील मतदानानंतरचा VIDEO व्हायरल, शशांक केतकरचं ट्रोलर्सना उत्तर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shashank Ketkar Video : शशांक केतकरने ठाण्याच्या इंटरनॅशनल शाळेबाहेर कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर शशांकने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
महापालिकांसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी अभिनेता शशांक केतकरनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता जो चांगलाच व्हायरल झाला. ज्या शाळेत शशांक मतदान करायला गेला होता त्या शाळेच्या बाहेर कचऱ्याचा ढीग पडला होता. ठाण्याच्या इंटरनॅशनल शाळेच्या बाहेरची ही दुर्दैवी परिस्थिती शशांकने व्हिडीओ शेअर करत सर्वांसमोर आणली. या व्हिडीओनंतर शशांकने आणखी व्हिडीओ शेअर केला आहे.
शशांक त्याच्या व्हिडीओमध्ये म्हणतोय, "आज आपण सगळ्यांनी मतदान केलं. मी सुद्धा मतदान केलं. ज्या शाळेत मतदान केलं त्या शाळेबाहेरचा व्हिडीओ मी केला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांचं म्हणणं होतं की तू असा निर्भीडपणे बोलतोस, तसाच बोलत रहा. हे सगळ्या ऑथोरिटिसच्या नजरेत आणून देत राहा. आपल्या समाजासाठी, आजूबाजूच्या परिसरासाठी तू कायम झटत राहतो, तसाच झटत राहा."
advertisement
"मला काहींनी ट्रोलही केलं. पण कौतुक आणि ट्रोलिंग हे दोन्ही मी समान पातळीवर मोजतो त्यामुळे मी ते कधी सोडूनही जात नाही आणि माझं पाऊल मागेही टाकत नाही. मला माहिती आहे यामागे एक नागरिक म्हणून माझं नेमकं काय उद्दिष्ट आहे."
advertisement
शशांकने नवीन व्हिडीओ करण्यामागचं कारण म्हणजे, त्याने ज्या शाळेबाहेरच्या कचऱ्याचा व्हिडीओ केला होता. त्या शाळेबाहेरचा कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. त्याचा बिफोर आणि आफ्टर फोटो शशांकने व्हिडीओमध्ये शेअर केला.
शशांक पुढे म्हणाला, "बघितलंत, सकाळी मी कचऱ्याचा व्हिडीओ टाकला आणि त्यावर एक्शन घेतली गेली. ज्यांनी एक्शन घ्यायला मदत केली त्या सगळ्यांने आभार. मी त्यांच्याशी वैयक्तिक फोनवरही बोललो आहे. फक्त मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखवली. आम्हा नागरिकांना तुम्हाला जे लक्षात आणून द्यावं लागतं की तिथे कचरा जमतो, तो कचरा उचलला जात नाहीये, डबल पार्किंग होतंय, रस्त्यात खड्डे आहेत. कुठेही लोक दुकानं लावतात, नियमांचं पालन केलं जात नाही, हे आम्हा नागरिकांना तुम्हाला सांगावं लागतं. ही दुर्दैवाची बाबा आहे. तुम्ही आमचे पालक आहे आणि पालकांचं सगळ्यांवर लक्ष असलं पाहिजे. त्यांच्या घराकडे, समाजाकडे लक्ष असलं पाहिजे."
advertisement
advertisement
"मी माझ्या आजूबाजूच्या परिसरासाठी असाच वोकल राहणार आहे. मला असं वाटतंय मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा वोकल व्हा. कारण मागची 30-40 वर्ष पाहिली किंवा त्याहीआधी. अशी एखादी घटना घडली तर ती अग्रलेखातून,मासिकातून, निबंधनातून लिहिली जायची. आता सोशल मिडिया आहे. प्रत्येक पिढीला एक माध्यम मिळतं त्यातून त्यांनी व्यक्त होत राहायचं असतं. मी सगळ्यांनी अपील करतो की, मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे त्याविषयी बोला. तुमच्या हातात सोशल मिडिया आहे त्याचा असा वापर करा. तुमचा आवजही ऐकला जाईल",असंही शशांकने सांगितलं.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 11:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला ट्रोल करण्यापेक्षा…' ठाण्यातील मतदानानंतरचा VIDEO व्हायरल, शशांक केतकरचं ट्रोलर्सना उत्तर









