Perfect Family: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक नव्या अंदाजात, नव्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर रिलीज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak New Web Series: गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया सेन्सेशन बनलेली गिरिजा ओक लवकरच एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई: सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजतंय, ते म्हणजे गिरिजा ओक. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया सेन्सेशन बनलेली गिरिजा ओक लवकरच एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते पंकज त्रिपाठी आता नवीन भूमिकेत आले आहेत. त्यांच्या 'ए जार पिक्चर्स प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेच्या पहिल्या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'परफेक्ट फॅमिली' नावाच्या या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची फौज असून, ही मालिका मानसिक आरोग्याच्या नाजूक विषयावर भाष्य करते.
या सीरिजमध्ये गुलशन देवैया, गिरिजा ओक, मनोज पाहवा, नेहा धुपिया आणि सीमा पाहवा यांसारखे मातब्बर कलाकार आहेत. सचिन पाठक यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. 'परफेक्ट फॅमिली' चा ट्रेलर एका आनंदी कौटुंबिक पार्टीने सुरू होतो. पण लगेचच घरात बाप-बेटे आणि सासू-सून यांच्यात होणारी तीव्र भांडणे आणि तणाव दिसू लागतो.
advertisement
घरातील या नकारात्मक वातावरणाचा परिणाम कुटुंबातील एका लहान मुलीच्या मनावर होतो. ती शाळेत विचित्र वागू लागते. मुलीच्या वागण्याबद्दल शाळेतील शिक्षक चिंता व्यक्त करतात आणि सांगतात की, घरातील नकारात्मक वातावरण तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे.
थेरपिस्ट म्हणून नेहा धुपियाची एंट्री
या बिघडलेल्या कुटुंबाला मार्गदर्शन करण्यासाठी अभिनेत्री नेहा धुपिया यांची एन्ट्री होते. ती यात थेरपिस्टची भूमिका साकारत आहे. घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या भावनिक संघर्षाशी आणि सामाजिक दबावांशी लढत आहे. ट्रेलर प्रत्येक पात्राचा छोटा प्रवास दाखवतो. ते मानसिक आरोग्याच्या आव्हानांना आपापल्या पद्धतीने कसे सामोरे जातात आणि एकमेकांचा आधार बनायला कसे शिकतात, हे या मालिकेतून स्पष्ट होते.
advertisement
advertisement
ही सीरिज कुटुंबाच्या अंतर्गत कथांमध्ये खोलवर उतरते आणि वैयक्तिक उपचार तसेच कौटुंबिक बंधांमधील नाजूक संतुलन दर्शवते. 'परफेक्ट फॅमिली' ही सीरिज जार पिक्चर्सच्या यूट्यूब चॅनल 'जार सिरीज' वर प्रदर्शित होणार आहे. याचा प्रीमियर २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निर्मात्यांनी पहिले दोन एपिसोड 'वॉच-फर्स्ट मॉडेल' अंतर्गत विनामूल्य उपलब्ध केले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 6:41 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Perfect Family: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक नव्या अंदाजात, नव्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर रिलीज


