advertisement

20 वर्षांनी 'सोनपरी' परत येतेय? फ्रूटीच्या फोटोंमुळे उत्सुकता वाढली

Last Updated:

जवळपास 20 वर्षांनी 'सोनपरी 2' येणार अशा चर्चा आहेत. खरंच सोनपरी 2 येणार का? पण अशा चर्चा का रंगल्या आहेत? पाहूयात.


20 वर्षांनी 'सोनपरी' परत येतेय?
20 वर्षांनी 'सोनपरी' परत येतेय?
मुंबई : 2000 साली टेलिव्हिजनवर एक शो सुरू झाला होता ज्याचं नाव होतं सोनपरी. मुलांच्या जगात या सोनपरीला वेगळंच स्थान होतं. मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोनपरीची प्रमुख भुमिका साकारली होती. आज मृणाल कुलकर्णी हे नाव काढल्यानंतर सोनपरीच डोळ्यांसमोर येते. जवळपास 20 वर्षांनी 'सोनपरी 2' येणार अशा चर्चा आहेत. खरंच सोनपरी 2 येणार का? पण अशा चर्चा का रंगल्या आहेत? पाहूयात.
सोनपरी मालिकेत फ्रूटीची भुमिकाही खूप गाजली. अभिनेत्री तन्वी हेगडे हिनं फ्रूटीची भुमिका साकारली होती. तिच्याबरोबर नेहमी परी आणि अल्टू अंकल असायचे. सोनपरीमधील फ्रूटी आता मोठी झाली आहे. ती आता 24 वर्षांची असून तिनं सोनपरी म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि अल्टू अंकल म्हणजेच अशोक लोखंडे यांच्याबरोबर फोटो शेअर केले आहेत.
advertisement
या तिघांचा हा फोटो त्यांच्या सोनपरी मालिकेतील फोटोशी कंपेर केला जात आहे. या फोटोंनी अनेकांच्या सोनपरीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तिघांचा फोटो पाहून आता सोनपरी 2 येणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram

A post shared by Tanvi Hegde (@tanvihegde)

advertisement
तन्वीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं मृणाल कुलकर्णी आणि अशोक लोखंडे यांच्याबरोबर सिंगल फोटो शेअर केलेत. या फोटोंबरोबर तिनं पोस्टमध्ये लिहिलंय, तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की आम्ही का भेटलो आहोत? आम्ही अजूनही संपर्कात आहोत का? आम्ही पुन्हा एकदा एका फ्रेममध्ये दिसणार का? आम्ही तुमच्यासाठी असं काय केलं आहे. सेटवरचे माझे आई-वडील आणि सगळ्यात चांगले सहकलाकार. आठवणींचा एक सुंदर प्रवास.
advertisement
अभिनेत्री तन्वी हिनं सोनपरीबरोबरच शाका लाका बूम बूम, हिप हिप हुर्रे सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. ती सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. 2016मध्ये ती एका मराठी सिनेमात दिसली होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
20 वर्षांनी 'सोनपरी' परत येतेय? फ्रूटीच्या फोटोंमुळे उत्सुकता वाढली
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement