advertisement

आशाताईंच्या चरणी नतमस्तक झाला सोनू निगम; गुलाबपाण्याने धुतले पाय, Video

Last Updated:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्कराचं प्रकाशन करण्यात आलं. इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.

सोनू निगम-आशा भोसले
सोनू निगम-आशा भोसले
मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आयुष्यावर आजवर अनेक गोष्टी चाहत्यांना माहिती आहेत. आशा भोसले यांच्या आयुष्यातील आणखी नव्या गोष्टी पुस्तक रुपानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. आशा भोसले यांच्या स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्कराचं प्रकाशन करण्यात आलं. इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. या सोहळ्यातील गायक सोनू निगमनं सर्वांचं लक्ष वेधलं.
पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर हे सहकुटुंब उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, गायिका अनुराधा पौडवाल आदी कलाकार उपस्थित होते.
advertisement
या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा यथायोग्य सन्मान करुन करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध गायक सोनू निगम यानं आशा ताईंचे पाय धुतले. गुलाबाच्या पाण्यानं पाय धूत अत्यंत श्रद्धेनं त्यानं आशा ताईंची सेवा केली. इतकंच नाही तर तो आशा ताईंच्या चरणी नतमस्तक झाला.
सोनू निगम आशा ताईंचे पाय धूत असताना तिथे मंत्र पठण देखील करण्यात आलं. सोनू निगम यावेळी पिवळा सदरा घालून आला होता. आशा ताईंबरोबरच त्यानं उपस्थित सगळ्या मान्यवरांचे आशिर्वाद घेतले.
advertisement
https://youtube.com/shorts/Lgi0wVx8DaU?si=x36CVuN2ouAHV0fw
सोनू निगम हा गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय. लहानपणापासूनच आशा ताई या सोनू निगमच्या गुरुस्थानी आहे. त्यांच्याकडे त्यानं शिक्षण देखील घेतलं आहे. दोघांनी अनेक गाणी देखील गायली आहेत. सोनू निगमच्या या कृतीनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
आशा ताईंच्या स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास, या पुस्तकात तब्बल 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे दुर्मिळ छायाचित्र आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आशाताईंच्या चरणी नतमस्तक झाला सोनू निगम; गुलाबपाण्याने धुतले पाय, Video
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement