करिष्मा कपूरची वाईट अवस्था, 2 महिन्यांपासून मुलांच्या शाळेची फीच नाही भरली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री करिष्मा कपूर सध्या चिंतेत आहे. संजय कपूरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांची शिक्षणासाठीही पैसे नसल्याची माहिती येत आहे. करिष्माच्या मुलीने कोर्टात ही गोष्ट सगळ्यांसमोर सांगितली.
अभिनेत्री करिष्मा कपूरचा एक्स नवरा बिझनेसमन संजय कपूरचा 12 जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आला. संजयच्या मृत्यूनंतर करिष्माची मुले समीरा आणि कियान यांनी संजयची तिसरी पत्नी आणि सावत्र आई प्रिया कपूर यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. संजय कपूरच्या तिने मृत्युपत्रात छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी लावलाय. करिष्मा कपूरची मुलं आणि संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कोर्टात आमने सामने आले. दरम्यान संजयच्या मृत्यूनंतर करिष्मा कपूरच्या मुलांचे हाल झाल्याचं दिसतंय. शाळेची फी भरायला पैसे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
संजय कपूरच्या मृत्युपत्राबाबत सुरू असलेल्या कायदेशीर वादात, बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरची मुलगी समायरा कपूर हिने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून तिच्या कॉलेजची फी भरलेली नाही. प्रिया कपूरने हा आरोप फेटाळला. कोर्टात अशा प्रकारच्या टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयाने तिला फटकारलं.
advertisement
शुक्रवारी उच्च न्यायालयाने करिष्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी दाखल केलेल्या अंतरिम मनाई याचिकेवर सुनावणी केली. ज्यामध्ये प्रिया कपूरला संजय कपूरची मालमत्ता विकण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. करिष्माच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी दावा केला की, अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या समायराची दोन महिन्यांची कॉलेजची फी देणं बाकी आहे.
advertisement
जेठमलानी यांनी युक्तिवाद केला की, "मुलांची मालमत्ता प्रतिवादी क्रमांक 1 प्रिया कपूरकडे आहे म्हणून ती तिची जबाबदारी आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या तिच्या मुलीला दोन महिन्यांचे शुल्क मिळालेले नाही." त्यांनी पुढे सांगितले की विवाह कायद्यानुसार, संजय कपूरने मुलांचं शिक्षण आणि राहण्याचा खर्च उचलणं अपेक्षित होतं.
प्रिया कपूरचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी हे दावे फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं की करिष्माच्या मुलांच्या वतीने जमा केलेला सर्व खर्च प्रियाने दिला होता. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी दोन्ही पक्षांना अशा बाबी न्यायालयात आणण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी प्रियाचे वरिष्ठ वकील श्याल त्रेहान यांना भविष्यात अशा बाबी योग्यरित्या हाताळल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
advertisement
न्यायाधीश म्हणाले, "मला यावर 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. हा प्रश्न माझ्या न्यायालयात पुन्हा येऊ नये. मला ही सुनावणी नाट्यमय होऊ द्यायची नाही. मी ही जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे. हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू नये." आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 1:35 PM IST


