'तारक मेहता'चा फेमस अभिनेता, अॅक्टिंग सोडून विकतोय सोया चाप; का आली अशी वेळ?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कधी काळी कमालीची प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्यावर आता सोयाचाप विकण्याची वेळ आली आहे. अभिनेत्यासोबत असं काय घडलंय.
मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांवर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. कधी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक त्यांना दारिद्र्य ओढवेल याची कल्पनाही करता येत नाही. तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमधील एका कलाकाराबरोबर असंच घडलं. कधी काळी कमालीची प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्यावर आता सोयाचाप विकण्याची वेळ आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील गुरुचरण सिंग हे नाव आजही घराघरात ओळखले जाते. मालिकेत त्यांनी साकारलेला रोशन सिंह सोधी हा पंजाबी पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या अभिनयाने आणि विनोदाने त्यांनी सर्वांना हसवलं. अभिनयापासून दुरावलेले गुरुचरण सिंह यांनी आता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.
( जिथे करायचे काम तिथेच केली 'हेरा फेरी', थेट बॉसच्या मुलीलाच पटवलं, परेश रावल यांची Filmy Love Story )
advertisement
दिल्लीत सुरू केलं स्वतःचं 'चाप' रेस्टॉरंट
गुरुचरण सिंग यांनी दिल्लीतील प्रेम नगर येथे सोपा चाप विकत आहेत. त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. @sodhi_gcs या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी याची जाहिरात केली आहे. त्यांचे जवळचे मित्रही सोशल मीडियावर त्यांच्या रेस्टॉरंटबद्दल पोस्ट शेअर करत आहेत.
संघर्षानंतर नवी सुरुवात
advertisement
गुरुचरण सिंग यांचा प्रवास सोपा नव्हता. अनेक वर्षे त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये काम केलं. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला. या काळात त्यांनी आर्थिक आणि मानसिक आव्हानांचा सामना केला. एप्रिल 2024 मध्ये ते अचानक बेपत्ता झाले होते. दिल्लीतून गायब झाल्यानंतर काही दिवसांनी ते हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात पोलिसांना सापडले. त्यावेळी त्यांनी सांगितले की ते मानसिक तणावाखाली होते आणि कर्ज फेडण्याच्या चिंता त्यांना त्रास देत होत्या.
advertisement
advertisement
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
गुरुचरण सिंग यांच्या या नव्या व्यावसायाचं चाहत्यांनी स्वागत केलं आहे. "सोधी भाई, तुसी रॉक करदे ओ",असं म्हणत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या बिझनसेच्या माध्यमातून ते त्यांच्यावर असलेलं कर्ज फेडू शकतील अशी सर्वांना आशा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 12:41 PM IST