'तारक मेहता'च्या कलाकारांना साइन करायला लागतं नो डेटिंग कॉन्ट्रॅक्ट? निर्माते म्हणाले, 'कायदे गरजेचे...'
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Tarak Mehta Ka Oolta Chashma : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी कलाकारांच्या कॉन्ट्रॅक्ट साइनवर एक स्पष्ट वक्तव्य केले आहे मालिका सोडून गेलेल्या कलाकारांनी त्यांच्यावर आरोप केले होते.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही हिंदी मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेने प्रेक्षकांचे कायमच मनोरंजन केले आहे. या मालिकेने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. मालिकेने प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख दिली. काही कलाकार ही मालिका सोडून गेले आहेत. तर काही कलाकार परत या मालिकेत काम करताना आपल्याला पाहायला मिळतात.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिंदी मालिकेला अनेक वर्ष प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी काही वादविवादांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. जेव्हा कलाकार ही मालिका सोडून जातात तेव्हा ते खूप नाराज होतात. त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं जातं असं म्हणतात.
advertisement
अफवांवर काय बोलले मोदी ?
असित मोदी यांनी या अफवांवरती भाष्य केलं. ते म्हणाले, "लोकं म्हणतात कलाकारांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अजब असे नियम आहेत. तर त्या लोकांनी स्वतःच येऊन हे कॉन्ट्रॅक्ट पाहावं. आम्ही असे कोणतेच नियम तयार केले नाहीत. जसे कि स्त्री-पुरुष डेट नाही करणार वेगरै. पण काही नियम आहेतच, कारण या मालिकेला आणि चॅनलला कोणताही धक्का बसणार नाही. सगळ्या कालाकारांना या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे चांगली ओळख मिळाली आहे. त्यामुळे त्यांना समजायला हवे की काही नियम हे बॉन्ड आणि सुरक्षिततेसाठी केले आहेत."
advertisement
मालिका सोडून गेलेल्या कलाकारां विषयी काय म्हणाले असित ?
असित मोदी मालिका सोडून गेलेल्या कलाकारांविषयी म्हणाले, "कालाकारांनी आपल्या कामात बेस्ट दिले आहे. मी कधीच कोणाला मालिका सोडून जा असे स्वतः सांगितले नाही. पण काही कलाकार हे मालिका सोडून जातात, ते असे वक्तव्य करतात जी खरंच चूकीची असतात. त्यातील काही कलाकार परत यायची इच्छा व्यक्त करतात आणि आलेही आहेत. पण मालिका चालत राहिली पाहिजे. त्यामुळे या वातावरणात नियम आणि कायदे खूप गरजेचे आहेत."
advertisement
आतापर्यंत जेनिफर मेस्त्री, गुरुचरण सिंह सोढी, शैलेश लोढा यांसारखे अभिनते मालिका सोडून गेले आहेत. त्यानंतर सोडून गेलेल्या कालाकारांनी निर्मात्यांवर अनेक आरोप केले होते. अभिनेत्री दिशा वकानी जी 8 वर्षांपासून गायब आहे, ती परत येण्याची उत्सुकता आजही चाहत्यांना आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तारक मेहता'च्या कलाकारांना साइन करायला लागतं नो डेटिंग कॉन्ट्रॅक्ट? निर्माते म्हणाले, 'कायदे गरजेचे...'


