Kalyan News : औषध की विष? गोळ्या खायला गेली अन् दिसलं भयंकर, महिलेचा भीतीने थरकाप, कल्याणमध्ये काय घडलं?
Last Updated:
Worms Found Inside Medicine : कल्याण शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. जिथे एका महिला रुग्णाने गोळ्या खाण्यासाठी घेतल्या मात्र जे घडलं ते पाहून सर्वजण हादरले आहेत.
कल्याण : कल्याणमधून एक धक्कादायक पण तितकीच संतापजनक घटना समोर आलेली आहे. उपचारासाठी देण्यात आलेल्या औषधांच्या गोळ्यांमध्ये चक्क जिवंत आळ्या आढळल्या आहेत. कल्याण पश्चिमेला राहणाऱ्या एका महिला नागरिकासोबत हा प्रकार घडलेला आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेला राहणारी एक महिला काही दिवसांपासून खांद्याच्या वेदनेने त्रस्त होत्या. त्यामुळे वेदनेवर आराम मिळावा म्हणून महिलेच्या मुलीने त्यांना कल्याणमधल्या एका प्रसिद्ध दवाखान्यात नेले. डॉक्टरांनाही योग्य ते उपचार करुन त्यांना काही गोळ्या दिल्या.
गोळ्या खाण्यासाठी घेतल्या पण तेवढ्याच...
महिलेने घरी आल्यावर गोळ्या घेण्यासाठी पाकीट उघडले. पण गोळ्या रंगाने काळपट दिसत होत्या.त्यामुळे त्यांनी गोळ्या हातात घेऊन नीट पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्यांचा थरकाप उडाला. त्या कॅप्सूलच्या आत चक्क अतिशय बारीक आळ्या हलताना दिसत होत्या. काही क्षण दोघी आई-मुलगी अवाक् होऊन बसल्या. त्यानंतर त्यांनी औषधांच्या पाकिटावरील मॅन्युफॅक्चरिंग तारीख आणि एक्स्पायरीची तारीखही पाहिली तीही योग्य होती.मग तरीही अशा गोळ्यांमध्ये अळ्या कशा काय आढळल्या हे त्यांना विचारात पाडणार होतं.
advertisement
तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली...
view commentsघडलेल्या प्रकारानंतर महिलेच्या मुलीने लगेच त्या दवाखान्यात धाव घेतली. गोळ्यांतील आळ्या पाहताच डॉक्टरही हादरले. त्यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगून तत्काळ औषध पुरवणाऱ्या प्राईड हेल्थ केअर एजन्सीशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित औषध उत्पादक कंपनीशीह संपर्क करून घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. कंपनीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हे प्रकरण थेट ग्राहक न्यायालयात नेण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : औषध की विष? गोळ्या खायला गेली अन् दिसलं भयंकर, महिलेचा भीतीने थरकाप, कल्याणमध्ये काय घडलं?


