बाहुला-बाहुलीचं थरारक रहस्य, संतोष जुवेकरचा सस्पेन्सने भरलेला सिनेमा, ट्रेलर पाहून अंगावर काटा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rukhwat Marathi Movie: सध्या क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या हॉरर सिनेमांची भरपूर क्रेझ आहे. प्रेक्षकांचा असे सिनेमा पाहण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकही हे सिनेमे बनवण्यावर भर देताना दिसून येत आहेत.
मुंबई : सध्या क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या हॉरर सिनेमांची भरपूर क्रेझ आहे. प्रेक्षकांचा असे सिनेमा पाहण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकही हे सिनेमे बनवण्यावर भर देताना दिसून येत आहेत. गेल्या काही काळात या जॉनरचे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसले. अशातच आता आणखी नवा कोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. बाहुला-बाहुलीचं थरारक रहस्य असलेला मराठी सिनेमा लवकर थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'रुखवत' हा मराठी थ्रिलर सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
समोर आलेल्या ट्रेलरमध्ये दिसतंय की, संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर बाहुला-बाहुलीच्या रहस्यांच्या थरारामध्ये अडकत आहेत. त्यांना नेमकं काय चाललंय समजत नाही पण कोणीतरी त्यांना खेचत आहे असं वाटतंय. सस्पेन्सने भरलेला हा सिनेमा असून 'रुखवत'मध्ये दिल्या जाणाऱ्या बाहुला-बाहुलींवर असल्याचं दिसतंय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा टच या सिनेमाला असल्याचं ट्रेलर पाहून समजतंय. ट्रेलर भीती वाढवत असून सिनेमा पाहण्याची उत्सुकताही वाढवत आहे.
advertisement
advertisement
या सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर आहेत. 'रुखवत' सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. विक्रम प्रधान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून रबी प्रोडक्शनची निर्मिती आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाहुला-बाहुलीचं थरारक रहस्य, संतोष जुवेकरचा सस्पेन्सने भरलेला सिनेमा, ट्रेलर पाहून अंगावर काटा!