1 पुस्तक लिहून पोसतोय 150 कुटुंब, संपूर्ण देश आहे दिवाना; कोण आहेत खरे तारक मेहता?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
टेलिव्हिजनवर येणाऱ्या मालिका फार फार 2-3 वर्ष सुरू असतात. पण तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेनं 15 वर्षांचा रेकॉर्ड केला आहे.
मुंबई, 26 डिसेंबर : तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो मागील 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मालिकेत दयाबेन तर सातासमुद्रापार गेली आहे. असिद मोदी यांच्या या शोची कथा प्रसिद्ध लेखक पद्मश्री तारक मेहता यांनी लिहिली आहे. पण सध्या मालिकेची कथा इतर लेखक पुढे नेत आहेत. मालिकेची पुढे नेताना मुळ कथेला धक्का बसणार नाही याकडे लेखक लक्ष देताना दिसत आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका ज्यांनी लिहिली आहे ते लेखक तारक मेहता यांचा जन्म 26 डिसेंबर 1929 साली झाला. 6 वर्षांआधीच तारक मेहता यांचं 87 व्या वर्षी निधन झालं. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकानं 15 लोकांचं पोट भरत आहे. तारक मेहता यांनी 52 वर्षांआधी 1971 साली गुजराती भाषेतील चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये दुनिया ने ऊंधा चश्मा नावानं कॉलम लिहायला सुरूवात केली होती. त्या कॉलमचं त्यांनी नंतर पुस्तकात रूपांतर केलं. नंतर हेच पुस्तक असिद मोदी यांनी तारक मेहता का उल्टा चश्माच्या स्वरूपात टेलिव्हिजनवर आणलं.
advertisement
हेही वाचा - Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या स्टारकास्टसोबत दिसली दयाबेन; लवकरच मालिकेत करणार एंट्री?
मालिकेत प्रमुख कलाकार आणि त्यांच्याबरोबर जळपास 150 लोक काम करतात. ज्यात कलाकार, लेखक, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह डायरेक्टर, मेकअप मन, असिस्टेंट डायरेक्टर, डिओपी, लाइटमन, स्पॉटमन, सिक्युरिटी असे कितीतरी लोक आहे.
टेलिव्हिजनवर येणाऱ्या मालिका फार फार 2-3 वर्ष सुरू असतात. पण तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेनं 15 वर्षांचा रेकॉर्ड केला आहे. टीआरपीच्या शर्यतीत अनेकदा मागे पडूनही ही मालिका सुरू ठेवली आहे. नीला टेलिफिल्म्सनी या मालिकेत काम करणाऱ्या लोकांना तारक मेहता का उल्टा चश्माचे सरकारी नोकर म्हटलं आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना आठवड्यात फक्त एकदा सुट्टी मिळते. प्रत्येकाकडून तीन महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यात येतं.
advertisement
एका गुजराती लेखकानं लिहिलेल्या गोष्टीमध्ये गोकुळधाम नावाची एक सोसायटी आहे. त्यात जेठालाल हा गुजराती माणूस आहे. त्याच्याबरोबर मराठी भिडे, यूपीचा पत्रकार पोपटलाल, पंजाबीचे सोढी, बंगालची बबिता अशी वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळे लोक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 2:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
1 पुस्तक लिहून पोसतोय 150 कुटुंब, संपूर्ण देश आहे दिवाना; कोण आहेत खरे तारक मेहता?