पैज लावा! 24 वर्षांपूर्वीचा 'तो' हॉरर शो आजही एकट्यात पाहता येणार नाही; भीतीने वळेल बोबडी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Horror Show :'आहट' आणि 'वो' यांसारखे अनेक दर्जेदार हॉरर शोज तुम्ही पाहिले असतील. पण 24 वर्षांपूर्वी आलेल्या एका लोकप्रिय हॉरर शोने अनेकांची झोप उडवली होती. भीती म्हणजे काय असते हे या मालिकेने दाखवून दिलं होतं.
Horror Show : हॉरर शो म्हणजे असा कार्यक्रम जो भीती आणि थराराने भरलेला असतो. या शोमध्ये भुते-प्रेतं, अलौकिक घटना आणि भीतीदायक सीन दाखवले जातात. जेणेकरून प्रेक्षकांना भीती आणि रोमांच अनुभवता येईल. 'आहट' आणि 'वो' यांसारखे अनेक हॉरर शोज तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील. या मालिकांची नावं ऐकताच त्याची कथा लगेच आठवते. आजच्या काळात हॉरर-कॉमेडीची एक वेगळीच क्रेझ आहे. पण त्याकीळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भुतांच्या गोष्टींना घाबरायचे. काही मोजके लोकच अशा भीतीदायक गोष्टी टीव्हीवर बघायला धजावत असत. काही जुने हॉरर शोज आता टीव्हीवर दिसत नाहीत. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहज पाहता येतात. ओटीटीवर अनेक जुन्या-नवीन चित्रपटांपासून ते वेब सीरीज आणि टीव्ही शोजपर्यंत सगळं काही एकत्र पाहायला मिळतं. पण एक जुना हॉरर शो अर्थात मालिका आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकते. ही मालिका 2001 मध्ये दूरदर्शनवर लागायची.
24 वर्षांपूर्वीची हा हॉरर शो पाहून आजही येतो अंगावर काटा
24 वर्षांपूर्वी हा हॉरर शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोचं नाव ऐकताचं त्याची भीतीदायक कथा लगेच आठवते. 'आप बीती' असं या मालिकेचं नाव आहे. दूरदर्शनवर ही मालिका दाखवली जात असे. 'महाभारत'च्या बी. आर. चोप्रा यांचा हा हॉरर शो रक्तरंजित आणि भयानक गोष्टींवर आधारित होता. प्रेक्षकांनी या मालिकेवर इतकं प्रेम केलं की आजही त्याच्या कथा आणि त्यातले कलाकार विसरले गेलेले नाहीत. या हॉरर शोची IMDb रेटिंग 7.6 आहे. या मालिकेत आयुष पांडे, अनंग देसाई, वाणी त्रिपाठी आणि निशिगंधा वाड हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
advertisement
'आप बीती' कुठे पाहू शकता?
'आप बीती' ही एक अलौकिक हॉरर सीरीज होती. जी बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली होती. रवि चोप्रा यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या अलौकिक घटनांची गोष्ट दाखवली जात होती.'आप बीती' या नावाने 1948 मध्ये एक बॉलिवूड चित्रपटही आला होता. कुमार स्टुडिओने या चित्रपटाची निर्मती केली होती. 'आप बीती' हा हॉरर शो आता यूट्यूबवर उपलब्ध आहे.
advertisement
धडकी भरवणाऱ्या कथा
view comments'आप बीती' या हॉरर शोमध्ये अशा अनेक भुताटकी कथा दाखवण्यात आल्या ज्या फक्त ऐकूनच भीती वाटायला लागते. त्याकाळी या शोने प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त स्थान मिळवलं होतं. कारण त्यात खर्या अर्थानं भितीदायक अनुभव दाखवले जात होते. आजही इंस्टाग्रामवर या मालिकेच्या टायटल साँगचे व्हिडीओ व्हायरल होतात. 5 जानेवारी 2001 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पैज लावा! 24 वर्षांपूर्वीचा 'तो' हॉरर शो आजही एकट्यात पाहता येणार नाही; भीतीने वळेल बोबडी