Bollywood Actor: टीव्हीवरचा स्टार, स्पाय चित्रपटातही केलंय काम, कधीकाळी होता बॉर्डरवर तैनात, कोण आहे हा रिअल हिरो?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Entertainment News : या सिनेइंडस्ट्रीत एका अभिनेत्यानं अभिनयाने केवळ प्रेक्षकांचे मन जिंकले नाही तर सैन्यात सामील होऊन देशाची सेवा देखील केली आहे. हा अभिनेता खऱ्या आयुष्यात सीमेवर सेवा बजावत होता.
मुंबई: सध्या मोठ्या पडद्यावर 'बॉर्डर २' चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. बॉर्डर चित्रपटाच्या या सिक्वेलला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणाऱ्या ऑपरेशन चंगेज खानवर आधारित आहे आणि त्यात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. युद्धपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, या सिनेइंडस्ट्रीत एका अभिनेत्यानं अभिनयाने केवळ प्रेक्षकांचे मन जिंकले नाही तर सैन्यात सामील होऊन देशाची सेवा देखील केली आहे. हा अभिनेता खऱ्या आयुष्यात सीमेवर सेवा बजावत होता.
कोण आहे रिअल लाइफ हिरो...
सिनेइंडस्ट्रीत आपली वेगळी छाप सोडणारा अभिनेता हा कमी वयातच सुरक्षा दलात सहभागी झाला होता. हा अभिनेता बी.आर. चोप्रा यांच्या "महाभारत" या मालिकेतही प्रमुख भूमिकेत दिसला आहे. हा अभिनेता म्हणजे प्रवीण कुमार सोबती. महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती केवळ अभिनयातच नाही तर क्रीडा आणि राजकारणातही झळकले आहेत. त्यांनी सीमा सुरक्षा दलात (BSF) डेप्युटी कमांडंट म्हणून देशाची सेवा केली.
advertisement
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग...
प्रवीण कुमार यांनी सीमा सुरक्षा दलात सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते. त्याच्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याने त्याने लगेचच त्याच्या वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने हॅमर थ्रो आणि डिस्कस फेक सारख्या खेळांवर प्रभुत्व मिळवले. १९६६ आणि १९७० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी डिस्कस फेकमध्ये सुवर्णपदके जिंकली आणि ५६.७६ मीटरचा आशियाई क्रीडा विक्रम प्रस्थापित केला. १९६६ च्या किंग्स्टन येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि १९७४ च्या तेहरान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने रौप्य पदकेही जिंकली. १९६८ च्या ऑलिंपिक आणि १९७२ च्या ऑलिंपिकमध्ये त्याने भाग घेतला. त्यांना १९६७ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
advertisement
चाचा चौधरीमध्ये साबूची भूमिका...
प्रवीण कुमार यांनी बी.आर. चोप्रा यांची लोकप्रिय मालिका, 'महाभारत' मध्ये भीमाची व्यक्तीरेखा साकारली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळाली. घराघरात प्रवीणकुमार लोकप्रिय झाले. त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीमुळे चाचा चौधरी या मालिकेत साबूची भूमिका साकारता आली. प्रेक्षकांना ही भूमिकाही आवडली.
राजकारणातही एन्ट्री...
त्यानंतर त्यांना हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका मिळाल्या. २०१३ मध्ये प्रवीण आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील झाले. त्यांनी वजीरपूर मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. सुरक्षा दलातील सेवा ते क्रीडा, अभिनय आणि राजकारण अशा क्षेत्रात स्वतःचे नाव कमावलेले प्रवीण यांचे ७ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
advertisement
स्पायपटात काम...
प्रवीण कुमार यांचा पहिला चित्रपट 'रक्षा' होता. या चित्रपटात जितेंद्र, परवीन बाबी यांची मुख्य भूमिका होती. हा जेम्स बाँड-शैलीचा भारतीय चित्रपट होता. प्रवीण यांनी "द स्पाय हू लव्हड मी" मधील जॉजपासून प्रेरित असलेल्या चित्रपटात गोरिल्ला नावाच्या एका मोठ्या गुंडाची भूमिका साकारली. त्यांनी 'मेरी आवाज सुनो' मध्ये जितेंद्रविरुद्ध लढणारा जस्टिन नावाचा एक मोठा गुंड देखील साकारला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:00 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Actor: टीव्हीवरचा स्टार, स्पाय चित्रपटातही केलंय काम, कधीकाळी होता बॉर्डरवर तैनात, कोण आहे हा रिअल हिरो?










