Jaya Ekadashi 2026: दिनांक 28 की 29 फेब्रुवारीला जया एकादशी? भीष्म द्वादशी, धार्मिक महत्त्व-मुहूर्त, व्रताचे नियम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Jaya Ekadashi 2026: पंचांगानुसार, माघ शुक्ल एकादशी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल आणि 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत 29 जानेवारी 2026, गुरुवारी पाळले जाईल.
मुंबई : प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते, असे मानले जाते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, जया एकादशीला केलेली आराधना मनोकामना पूर्ण करणारी आणि विशेष कृपा मिळवून देणारी ठरते.
जया एकादशी तिथी आणि वेळ - पंचांगानुसार, माघ शुक्ल एकादशी 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल आणि 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत 29 जानेवारी 2026, गुरुवारी पाळले जाईल.
जया एकादशीचे व्रत दोन प्रकारे केले जाते: निर्जला (पाण्याशिवाय) आणि फलाहारी. केवळ निरोगी व्यक्तीनेच निर्जला उपवास करावा, तर सामान्य किंवा आजारी व्यक्तींसाठी फलाहारी व्रत अधिक योग्य मानले जाते. या दिवशी श्रीकृष्णाला फळे, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे श्रेष्ठ मानले जाते.
advertisement
ग्रह शांतीसाठी विशेष उपाय - ग्रहांच्या शांतीसाठी पूर्व दिशेला एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी. धूप-दीप लावून कलश स्थापना करावी. त्यानंतर वस्त्र, फळे, फुले, पान आणि सुपारी अर्पण करावी. उजव्या हातात जल घेऊन पीडित ग्रहांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. संध्याकाळी जया एकादशीची व्रत कथा ऐकून फलाहार घ्यावा. शक्य असल्यास रात्री भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करावा. खऱ्या श्रद्धेने केलेल्या या उपायांमुळे श्रीकृष्णाची कृपा नक्कीच प्राप्त होते.
advertisement
काय करावे आणि काय टाळावे?
या दिवशी गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्प करावा. पिंपळ आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तामसिक भोजन, नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे. मन जास्तीत जास्त कृष्णभक्तीत रमवावे. जर आरोग्य ठीक नसेल तर उपवास करू नये, केवळ व्रताच्या नियमांचे पालन करावे. या गोष्टींचे भान ठेवल्यास जया एकादशीचे पुण्यफळ मिळते आणि जीवनातील अनेक कष्टांतून मुक्ती मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 8:58 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Jaya Ekadashi 2026: दिनांक 28 की 29 फेब्रुवारीला जया एकादशी? भीष्म द्वादशी, धार्मिक महत्त्व-मुहूर्त, व्रताचे नियम










