कथा कोकणची, व्यथा महाराष्ट्राची!, 'दशावतार' पाहून उद्धव ठाकरेंनी का दिली अशी रिअॅक्शन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Uddhav Thackeray praises Dashavatar : सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने 9 कोटींहून अधिक कमाई केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सिनेमा पाहून सगळ्यांचं कौतुक केलंय.
मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. सिनेमानं 9 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पाहणारा प्रत्येक प्रेक्षक दशावतारचं कौतुक करतोय. सुबोध खालोनकर यांची कथा आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं सर्वाधिक कौतुक होतंय. मराठीच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही दशावतारचं कौतुक केलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब दशावतार हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत हा सिनेमा कोकणचा असला तरी त्यात महाराष्ट्राची व्यथा मांडली आहे असं म्हटलं.
"दशावतार या सिनेमाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी पुढे असं म्हटलं की, "सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय."

सिनेमा पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आवाहन
उद्धव ठाकरे यांनी दशावतार सिनेमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. अभिनेता सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. आपण कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला, ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे. केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
advertisement
उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'दशावतार' सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.
.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कथा कोकणची, व्यथा महाराष्ट्राची!, 'दशावतार' पाहून उद्धव ठाकरेंनी का दिली अशी रिअॅक्शन?