Vijay Deverakonda Accident : विजय देवरकोंडाचा भीषण अपघात, साखरपुड्याच्या 72 तासांतच घडलं अघटित

Last Updated:

Vijay Deverakonda Accident : सोमवारी विजय देवरकोंडासोबत एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली. विजयच्या कारला एका दुसऱ्या गाडीने धडक दिली.

vijay devarakonda
vijay devarakonda
हैदराबाद : अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत साखरपुडा आणि लग्नाच्या जोरदार चर्चांमुळे अभिनेता विजय देवरकोंडा सध्या चर्चेत आहे. अशातच, सोमवारी विजय देवरकोंडासोबत एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली. टॉलिवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्याचा एका भीषण अपघाता झाला आहे. हैदराबाद-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच एनएच-४४ वर हा अपघात झाला, जिथे विजयच्या कारला एका दुसऱ्या गाडीने धडक दिली.
हा अपघात इतका भयानक होता की, विजयच्या गाडीच्या डाव्या बाजूला मोठा धक्का बसून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर विजय देवरकोंडाने जराही वेळ न घालवता तातडीने आपल्या एका मित्राला बोलावले. मित्राच्या गाडीतून तो थेट हैदराबादच्या दिशेने रवाना झाला. अपघातानंतर तातडीने दुसऱ्या गाडीतून निघून जाण्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता निर्माण झाली होती.
advertisement

पोलिसांनी दिली अपघाताची माहिती

या अपघाताविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, "अभिनेता विजय देवरकोंडा आज दुपारी साधारण तीन वाजता पुट्टपर्थी येथून हैदराबादला आपल्या कारने जात होता. त्यावेळी पुढे चाललेल्या एका बोलेरो गाडीने अचानक उजवीकडे वळण घेतले. या बोलेरोचा उजवा भाग विजयच्या कारच्या डाव्या भागाला धडकला."
advertisement
पोलिसांनी स्पष्ट केले की, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विजयच्या गाडीत त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. अपघात होताच, ते सर्वजण तात्काळ दुसऱ्या गाडीत बसून निघून गेले.
विजय देवरकोंडाची टीम इतकी घाईत होती की, त्यांनी अपघाताचा किंवा नुकसानीचा कोणतीही मोठी तक्रार दाखल केली नाही. केवळ गाडीच्या विम्यासाठी त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. सध्या विजय देवरकोंडा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि अपघातानंतर त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात मोठा असला तरी, विजयने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vijay Deverakonda Accident : विजय देवरकोंडाचा भीषण अपघात, साखरपुड्याच्या 72 तासांतच घडलं अघटित
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement