Palghar: 50 हजारांसाठी 14 वर्षांच्या नातीला विकलं, पुढे घडलं भयानक, पोलीसही संतापले; पालघरमधील संतापजनक घटना

Last Updated:

या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलीचा नवरा जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे याला वाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर : पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फक्त 50 हजार रुपयांसाठी एका 14 वर्षीय मुलीची आजीनेच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील कातकरी जमातीच्या मुलीची तीन वर्षांपूर्वी विक्री झाल्याचं समोर आलं आहे. या मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं होतं. अखेरीस या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला 50 हजार रुपयांना खरेदी करून तिच्यासोबत जबरदस्ती लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघरच्या वाडा तालुक्यात समोर आला आहे. वाडा तालुक्यातील एका कातकरी समाजाच्या मुलीला 50 हजार रुपयांना तीन वर्षांपूर्वी खरेदी करून तिच्यासोबत जबरदस्ती लग्न करण्यात आलं होतं. यानंतर या मुलीची प्रसुती झाल्यावर या मुलीला मुलगीच झाल्याचा राग मनात धरून आरोपींकडून या मुलीचा छळ सुरू करण्यात आला.
advertisement
याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीने वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील गाडे कुटुंबावर वाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात विक्री करणाऱ्या तीन दलालांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी मुलीची विक्री
या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात 370 मानवी तस्करी, 420 फसवणूक, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सोसह विविध कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलीचा नवरा जीवन गाडे आणि दलाल रवी कोरे याला वाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर आणखीन चार आरोपींचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही अल्पवयीन मुलगी 14 वर्षांची असतानाच तीन वर्षांपूर्वी तिची खरेदी करण्यात आली होती. मात्र यावर्षी या मुलीचा सासरच्यांकडून छळ वाढल्याने तिने ही फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar: 50 हजारांसाठी 14 वर्षांच्या नातीला विकलं, पुढे घडलं भयानक, पोलीसही संतापले; पालघरमधील संतापजनक घटना
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement