विक्रांत मेस्सीच्या मुलाचा धर्म कोणता? 'बारावी फेल' स्टारचा मोठा निर्णय, म्हणाला 'मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vikrant Massey Son Vardaan Religion : अभिनेता विक्रांत मेस्सीला २०२४ मध्ये एक गोंडस मुलगा झाला, ज्याचं नाव त्याने वरदान ठेवलं आहे. आता, 'वरदान'च्या धर्माबाबत विक्रांतने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
मुंबई : 'बारावी फेल' आणि 'सेक्टर ३६' यांसारख्या चित्रपटांमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. व्यावसायिक जीवनातून काही काळ ब्रेक घेऊन तो सध्या पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवत आहे. मात्र, यावेळी तो त्याच्या व्यावसायिक नव्हे, तर खासगी आयुष्यातील एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी शीतल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या विक्रांतला, २०२४ मध्ये एक गोंडस मुलगा झाला, ज्याचं नाव त्याने वरदान ठेवलं आहे. आता, या 'वरदान'च्या धर्माबाबत विक्रांतने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
वरदानला कोणताही धार्मिक 'लेबल' नाही
काही दिवसांपूर्वीच विक्रांत मेस्सीने स्पष्ट केलं होतं की, तो आपल्या मुलाला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वाढवणार आहे. विक्रांत आणि शीतलने त्याच्या जन्म दाखल्यावर धर्माचा उल्लेख केलेला नाही. नुकत्याच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये विक्रांत मेस्सीने याबाबत सविस्तर सांगितलं. विक्रांत म्हणाला की, "धर्म ही वैयक्तिक निवड आहे. जीवन जगण्याचा हा माझा एक मार्ग आहे."
advertisement
तो पुढे म्हणाला, "मला वाटतंय की, प्रत्येकाला त्यांचा धर्म निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. माझ्या घरात तुम्हाला प्रत्येक धर्माचे लोक सापडतील. माझा असा विश्वास आहे की, धर्म मानवांनी निर्माण केला आहे. मी पूजा करतो, मी गुरुद्वारा, दर्ग्यातही जातो. या सर्व गोष्टींमुळे मला शांती मिळते." विक्रांतने स्पष्ट केलं की, "माझा मुलगा कोणत्याही धार्मिक लेबल आणि भेदभावाशिवाय मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे."
advertisement
मोठा झाल्यावर वरदान स्वतःच धर्माची निवड करेल!
विक्रांत मेस्सीने सांगितलं की, जेव्हा वरदान मोठा होईल आणि त्याला सर्व गोष्टी समजू लागतील, तेव्हा तो स्वतःच आपला धर्म निवडेल. अभिनेत्याने पुढे सांगितलं की, "आम्ही मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर धर्माचा कॉलम रिकामा ठेवला आहे. त्यामुळे जेव्हा त्याचं बर्थ सर्टिफिकेट आलं, तेव्हा त्यावर धर्म लिहिलेला नव्हता."
advertisement
विक्रांतच्या या भूमिकेमागे त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही आहे. तो अशा कुटुंबातून येतो, जिथे लोक धर्म आणि जातीला फारसं महत्त्व देत नाहीत. विशेष म्हणजे, त्याच्या कुटुंबात विविध धर्माचे लोक आहेत. अभिनेत्याचे वडील ख्रिश्चन आहेत, आई शीख आहे आणि मोठा भाऊ मुस्लिम आहे. अशा धार्मिक विविधतेत वाढल्यामुळेच विक्रांतने आपल्या मुलाला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट होतं.
advertisement
"जर मला कळलं की, माझा मुलगा एखाद्या व्यक्तीसोबत त्याच्या धर्मावरून वागतोय, तर मला खूप वाईट वाटेल. कारण मी माझ्या मुलाला असं वाढवत नाहीये," असं विक्रांतने ठामपणे सांगितलं. विक्रांत मेस्सीने घेतलेला हा निर्णय सध्या समाजमाध्यमांवर आणि बॉलिवूडमध्येही कौतुकाचा विषय बनला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
विक्रांत मेस्सीच्या मुलाचा धर्म कोणता? 'बारावी फेल' स्टारचा मोठा निर्णय, म्हणाला 'मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर...'


