Vishal Pandey Accident : हाताची नस कापली, पॅरालाईज होता-होता वाचला, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचा भयानक अपघात!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vishal Pandey accident : ‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विशाल पांडेसोबत एक खूप मोठा आणि भयानक अपघात घडला आहे.
मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विशाल पांडेसोबत एक खूप मोठा आणि भयानक अपघात घडला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. विशालने नुकतंच हॉस्पिटलमधून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तो गंभीर अवस्थेत दिसत आहे. त्याने सांगितलं की, एका अपघातात त्याची नस कापली गेली आणि तो पॅरालाईज होता होता वाचला.
शूटिंगमध्ये घडला अपघात!
विशाल पांडेने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत सांगितलं की, त्याला अभिनयाची खूप आवड आहे, पण त्याला वाटलं नव्हतं की, काम करताना त्याच्यासोबत असा भयानक अपघात होईल. विशाल एका प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये होता, तेव्हा एका काचेच्या तुकड्याने त्याची नस कापली गेली, ज्यामुळे त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला.
advertisement
त्याने सांगितलं, “माझ्यासोबत हा अपघात घडल्यामुळे मी पूर्णपणे हादरून गेलो आहे. या घटनेनंतर मला दोन ऑपरेशन करावी लागली, ज्यामुळे माझा जीव वाचला.” विशालने पुढे सांगितलं की, जे लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप कठीण असतो. त्याच्या या शब्दांतून त्याला झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास स्पष्टपणे दिसत आहे.
advertisement
काही इंच दूर होता, नाहीतर...
विशालने त्याच्या पोस्टमध्ये एक खूपच भीतीदायक गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला, “डॉक्टरांनी मला सांगितलं की, माझी धमनी फक्त काही इंच दूर होती, जर ती कापली गेली असती, तर माझं अर्धा शरीर पॅरालाईज झालं असतं.”
advertisement
हे ऐकून विशाल अजूनही थरथरतो, पण त्याला त्याची नियती आणि नशिबावर विश्वास आहे की तो वाचला. तो त्याच्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि चाहत्यांचा खूप आभारी आहे. विशालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सूर्य नेहमी पुन्हा उगवतो आणि मी सुद्धा पुन्हा उभा राहीन.” त्याने सर्वांना विश्वास दिला आहे की, तो लवकरच परत येईल आणि त्याला कोणीही थांबू शकणार नाही. दरम्यान, विशालचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत आणि त्याच्या हेल्थ अपडेट्सची वाट पाहत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vishal Pandey Accident : हाताची नस कापली, पॅरालाईज होता-होता वाचला, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचा भयानक अपघात!