'कोणी अधिकार दिला?', नव्या घराचा VIDEO व्हायरल होताच आलिया भडकली, म्हणते 'हा कंटेंट नाही...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आलिया भट्टने मुंबईतील नव्या बंगल्याचा व्हिडिओ परवानगीशिवाय व्हायरल झाल्याने नाराजी व्यक्त केली. ती ‘अल्फा’ व ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे.
मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप नाराज आहे. तिचा आणि रणबीर कपूरचा मुंबईतील नवा बंगला पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच एका मीडिया हाऊसने या बंगल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे आलिया इतकी भडकली की, तिने थेट एक पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मुंबईतील जागेची समस्या मान्य केली, पण कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या खासगी जागेचा व्हिडिओ बनवून तो ऑनलाइन शेअर करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
'कोयता घेऊन अंगावर आले आणि...', अभिनेत्रीला वडिलांकडूनच मिळाली भयंकर वागणूक, सांगितला जीवघेणा प्रसंग
आलियाने पोस्टमध्ये लिहिलं आहे, “मला जाणीव आहे की मुंबईसारख्या शहरात जागा कमी आहे. अनेक वेळा तुमच्या घराच्या खिडकीतून दुसऱ्याचं घर दिसतं, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणाच्याही खासगी जागेचा व्हिडिओ बनवून तो ऑनलाइन शेअर करण्याचा अधिकार आहे.”
advertisement
ती पुढे म्हणाली, “आमचं घर, ज्याचं अजूनही बांधकाम सुरू आहे, कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आणि आमच्या परवानगीशिवाय तो अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला. हा गोपनीयतेचा भंग आहे आणि सुरक्षेशी संबंधित एक मोठी समस्या आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या खासगी जागेचा व्हिडिओ बनवणं हा कंटेंट नाही, हे उल्लंघन आहे. याला सामान्य मानू नये.”
advertisement
advertisement
गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या या घराचं काम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत जवळपास २५० कोटी रुपये आहे. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटात दिसणार आहे, जो २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तसेच, ती पती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातही काम करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कोणी अधिकार दिला?', नव्या घराचा VIDEO व्हायरल होताच आलिया भडकली, म्हणते 'हा कंटेंट नाही...'


