Women Centric Films : नवरात्रीत प्रत्येक महिलेने पाहावे 'हे' सुपरहिट महिलाप्रधान चित्रपट; एकदा पाहाच!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Women Centric Films : यंदाच्या नवरात्रीला बॉलिवूडमधील टॉप महिला प्रधान चित्रपट पाहायचा विचार करताय. तर प्रत्येक महिलेसाठी खास असणारे हे चित्रपट नक्की पाहा. मजबूत महिला व्यक्तिरेखा, प्रेरणादायक कथा आणि सशक्त संदेशांनी भरलेले हे चित्रपट नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
Top Women Centric Bollywood Films : बॉलिवूडमध्ये अनेक अशा चित्रपटांची निर्मिती झाली आहे ज्यात महिलांचे संघर्ष, धैर्य आणि स्वावलंबनाची कथा सांगितली गेली आहे. या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केलं नसून समाजासाठी एक प्रेरणादायी संदेशही दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला प्रेरणा नक्की मिळेल. हे चित्रपट आपल्याला आत्मविश्वास, स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आणि आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याचं धाडस शिकवतात. हे चित्रपट फक्त कथा नाहीत, तर एक प्रेरणा आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये एक साम्य आहे. हे चित्रपट महिलांना स्वावलंबी आणि धैर्यवान बनण्याची प्रेरणा देतात.
advertisement
चक दे! इंडिया
एका हॉकी टीमची गोष्ट 'चक दे! इंडिया' या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एका पुरुषप्रधान खेळात महिला खेळाडूंना आपली जागा सिद्ध करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, हे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे दाखवले आहे. हा चित्रपट दाखवतो की, जर जिद्द आणि मेहनत असेल, तर कोणतीही महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते.
advertisement
मर्दानी
महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांवर आधारित मर्दानी हा चित्रपट एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या ताकदीचं प्रतिनिधित्व करतो. हा चित्रपट प्रत्येक महिलेला हे जाणवून देतो की, ती कमजोर नाही आणि गरज भासली तर ती आपल्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी लढू शकते. समाजात होणाऱ्या अन्यायाचा अंत करण्यासाठी आवाज उठवणं हाच पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो.
advertisement
क्वीन
कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते की, आपल्याला स्वतःला समजून घेण्याची आणि आपल्या आतला आवाज पुन्हा एकदा शोधण्याची गरज भासते. हा चित्रपट प्रत्येक त्या महिलेची कथा आहे, जिने समाजाने घालून दिलेल्या सीमारेषांच्या बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध केलं. ‘क्वीन’ आपल्याला शिकवतो की, एका महिलेचं आयुष्य केवळ लग्न आणि नातेसंबंधांपुरतं मर्यादित नसतं, तर तिचे स्वतःचेही काही स्वप्नं असतात.
advertisement
पिंक
‘नाही’ हा फक्त एक शब्द नाही, तर एक पूर्ण वाक्य आहे, हाच संदेश पिंक हा चित्रपट समाजाला देतो. आजही अनेक महिलांना आपल्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी लढा द्यावा लागतो, आणि हा चित्रपट त्याच संघर्षाचं चित्रण करतो. हा चित्रपट प्रत्येक महिलेला शिकवतो की, आपल्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही.
advertisement
थप्पड
'थप्पड' हा चित्रपट एक साधा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न उचलतो. एक चापट सहन केली जाऊ शकते का? समाजात अनेकदा महिलांना सहनशीलतेचं प्रतीक मानलं जातं, पण हा चित्रपट दाखवतो की सन्मानापेक्षा मोठं काहीच नसतं. हा चित्रपट प्रत्येक महिलेला हे जाणवून देतो की स्वाभिमानासोबत कधीही तडजोड केली जाऊ नये.
advertisement
दंगल
'दंगल' हा फक्त एका खेळावर आधारित चित्रपट नाही, तर त्या समाजाचं वास्तव आहे जिथे मुलींना कमजोर समजलं जातं. ‘दंगल’ दाखवतो की, मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. मेहनत आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्या प्रत्येक आव्हानावर मात करू शकतात. हा चित्रपट विशेषतः त्या कुटुंबांसाठी एक प्रेरणा आहे, जे मुलींना स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची मुभा देत नाहीत.
गंगूबाई काठियावाडी
'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट एका अशा महिलेची कथा आहे जिने प्रतिकूल परिस्थितींमध्येही हार मानली नाही आणि आपल्या ताकदीवर समाजात स्वतःचं स्थान निर्माण केलं. हा चित्रपट प्रत्येक महिलेला शिकवतो की, परिस्थिती कितीही कठीण असो, जर धैर्य असेल तर कोणतीही व्यक्ती आपलं आयुष्य बदलू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Women Centric Films : नवरात्रीत प्रत्येक महिलेने पाहावे 'हे' सुपरहिट महिलाप्रधान चित्रपट; एकदा पाहाच!