Toxic : बोल्डनेस-क्रूरतेचा ओव्हरडोस, पूर्ण सिनेमा सोडा Toxic चा टिजरही घरच्यांसमोर पाहता येणार नाही; यशचा सर्वात डार्क Look

Last Updated:

या सिनेमामध्ये यश मेन लिडमध्ये असला तरी त्याच्यासोबत स्टार अभिनेत्री देखील आहेत. शिवाय हा सिनेमा महिला सशक्तीकरणाशी संबंधीत आहे, असं सांगितलं जात आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सिनेसृष्टीत काही कलाकार असे असतात, ज्यांच्या प्रत्येक नव्या घोषणेची चाहत्यांना उत्सुकतेने वाट पाहावी लागते. त्यातच जर ती घोषणा कलाकाराच्या वाढदिवसाच्या दिवशी झाली, तर अपेक्षा आणखी वाढतात. साउथ सुपरस्टार यशच्या चाहत्यांसाठी यंदाचा वाढदिवस खास ठरला आहे. यशच्या जन्मदिनानिमित्त त्यांची मोस्ट अवेटेड फिल्म ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’चा टीझर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे.
तीन मिनिटांच्या या टीझरमध्ये प्रचंड अ‍ॅक्शन, स्टाईल आणि यशचा दमदार अवतार पाहायला मिळतो. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. टिजर खूपच दमदार आहे. ज्यामुळे लोकांना आत्तापासूनच सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण सिनेमा पाहण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण हा सिनेमा 19 मार्चला रिलिज होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
या सिनेमामध्ये यश मेन लिडमध्ये असला तरी त्याच्यासोबत स्टार अभिनेत्री देखील आहेत. शिवाय हा सिनेमा महिला सशक्तीकरणाशी संबंधीत आहे, असं सांगितलं जात आहे.
काही तासांपूर्वीच रिलीज झालेल्या टिजरमध्ये सुपरस्टार यशची अतिशय दमदार आणि 'लार्जर दॅन लाईफ' एन्ट्री पाहायला मिळत आहे. एका शांत कब्रिस्थानच्या पार्श्वभूमीवर हा सीन सुरू होतो. तिथे सगळं काही शांत असताना अचानक एका भरधाव कारची एन्ट्री होते आणि वातावरणात तणाव वाढतो. त्यापाठोपाठ होणाऱ्या जोरदार फायरिंगने प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो.
advertisement
परंतु, खरी चर्चा रंगली आहे ती या कारमधील यशच्या एन्ट्रीची. या सिनेमात यशचं नाव राया आहे, यश एका महिलेसोबत या कारमध्ये दिसतो. मात्र, त्याआधी कारच्या आत या दोघांमधील काही अतिशय जवळचे आणि बोल्ड क्षण दाखवण्यात आले आहेत. यशचा हा 'रॉ' आणि तितकाच रोमँटिक अवतार खरोखरच थक्क करणारा आहे. ही एन्ट्री केवळ ॲक्शनपुरती मर्यादित नसून, त्यात एक वेगळीच बोल्डनेस आणि रहस्य दडल्याचं टिजरवरून स्पष्ट होतंय."
advertisement
इंडस्ट्रीकडून टीझरला भरभरून दाद
‘टॉक्सिक’च्या टीझरवर ज्येष्ठ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या एक्स (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांचा फोटो शेअर करत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, ‘यश स्टारर ‘टॉक्सिक’चा टिजर पाहिल्यानंतर मला याबाबत कोणतीही शंका उरलेली नाही की गीतू मोहनदास या महिला सशक्तीकरणाचं जिवंत प्रतीक आहेत. कोणताही मेल दिग्दर्शक या पातळीचं दिग्दर्शन करू शकणार नाही. त्यांनी ही फिल्म शूट केली आहे, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही.’
advertisement
करण जोहर आणि संदीप रेड्डी वांगाची प्रतिक्रिया
टीझरवर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये करण जोहर आणि संदीप रेड्डी वांगा यांचाही समावेश आहे. करण जोहर यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर टीझर शेअर करत लिहिले, ‘वा… वाढदिवसाची किती शानदार घोषणा. खरंच कमाल. यश, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हे खूपच जबरदस्त आहे.’
advertisement
तर ‘एनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ट्वीट करत म्हटले, ‘टॉक्सिकचा टीझर पाहून मी थक्क झालो आहे. स्टाईल. अ‍ॅटिट्यूड. थैमान. यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
‘टॉक्सिक’बद्दल खास माहिती
‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या फिल्मची कथा गीतू मोहनदास आणि यश यांनी मिळून लिहिली आहे. यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ते एका गँगस्टरच्या भूमिकेत झळकणार आहेत.
advertisement
चित्रपटात यशसोबत रुक्मिणी वसंत, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरैशी, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
यशच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या या टीझरमुळे ‘टॉक्सिक’बाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Toxic : बोल्डनेस-क्रूरतेचा ओव्हरडोस, पूर्ण सिनेमा सोडा Toxic चा टिजरही घरच्यांसमोर पाहता येणार नाही; यशचा सर्वात डार्क Look
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement