'आमचं चांगलं चाललंय...', संतापलेली अभिनेत्री थेट चॅनलशी नडली, डिलीट केलेली 'ती' पोस्ट व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zee Marathi New TV Shows : झी मराठीवर ११ ऑगस्टपासून तेजश्री प्रधानची नवी मालिका सुरू होत आहे. त्यामुळे ३ लोकप्रिय मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत. याबाबत एका अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : झी मराठीवर लवकरच नव्या मालिका सुरू होणार असून आपल्या लाडक्या अभिनेत्रींना पुन्हा भेटण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. तेजश्री प्रधानची 'वीण दोघांतली ही तुटेना' ही नवी मालिका ११ ऑगस्टपासून सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. अशातच वाहिनीने येत्या ११ ऑगस्टपासून ३ लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच यातील एका मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावर वाहिनीला मालिकेची वेळ न बदलण्याची विनंती केली आहे.
झी मराठी वाहिनीने सांगितल्याप्रमाणे, ११ ऑगस्टपासून 'पारू' मालिका संध्याकाळी ७:३० ऐवजी ७ वाजता प्रसारित होईल. तर, ७ वाजता प्रसारित होणारी 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता ऑन एअर होईल. याशिवाय, 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेची वेळ चौथ्यांदा बदलण्यात आली असून, ती आता सायंकाळी ६ वाजता प्रसारित केली जाईल. वाहिनीचा हा निर्णय या मालिकांमधील कलाकारांना पटलेला नाही. अशातच 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील अभिनेत्री मेघा धाडेने थेट झी मराठी वाहिनीला विनंती केली आहे.
advertisement
मेघा धाडे सध्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत 'भैरवी वझे'ची भूमिका साकारत आहे. नुकतंच तिने नव्या मालिकेच्या प्रोमोवर थेट कमेंट करत एका मालिकेसाठी ३ मालिकांची वेळ बदलण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तिने तिच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे, "'पारू' मालिका ठेवा ना ६:३० वाजता. आमच्या सावलीचा टाइम स्लॉट का बदलत आहात… निदान ३ पैकी एका मालिकेचा टाइम स्लॉट तरी बदलणार नाही. हे करून तुम्ही ३ मालिकांचं नुकसान करताय 'झी मराठी' प्लीज, मी विनंती करते की, 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेची वेळ बदलू नका." मेघा धाडेने ही कमेंट काही वेळातच डिलीट केली असली तरी, तिच्या कमेंटचा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे.
advertisement

इतकंच नाही, तर याच मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवीनेही यावर आपलं मत मांडलं आहे. तिने लिहिलं आहे, "सावळ्याची जणू सावली या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. लोकांना सुद्धा ही मालिका आवडतेय. लोक रोज न चुकता ही मालिका बघत आहेत आणि आता जर वेळ बदलली, तर हे बरोबर ठरणार नाही… झी मराठी."
advertisement

एका नव्या मालिकेसाठी 'झी मराठी'ने एकाच वेळी ३ मालिकांच्या वेळेत बदल केला आहे. येत्या ११ ऑगस्टपासून हे महत्त्वाचे बदल वाहिनीवर अंमलात येतील. दरम्यान, नव्या मालिकांसाठी प्रेक्षकांची उत्सुकता असली तरी, जुन्या लोकप्रिय मालिकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची नाराजी कलाकारांसोबत प्रेक्षकांमध्येही दिसून येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 26, 2025 3:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आमचं चांगलं चाललंय...', संतापलेली अभिनेत्री थेट चॅनलशी नडली, डिलीट केलेली 'ती' पोस्ट व्हायरल






