120000 वर्षांपासून आग ओकत आहे 'हे' रहस्यमय शहर, समुद्राच्या तळाशी 90°c आहे तापमान...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
अटलांटिक महासागरात 25 वर्षांपूर्वी एक हरवलेले शहर सापडले आहे, जिथे 1.2 लाख वर्षांपासून गरम द्रव आणि वायू बाहेर पडत आहेत. या ठिकाणी सूक्ष्मजीव जीवन आहे आणि ते मंगळाच्या चंद्राशी संबंधित असू शकते.
माणसाने पृथ्वीवरील प्रत्येक कोपरा पादाक्रांत केला असला, तरी अजूनही काही रहस्यमय ठिकाणं उलगडायची आहेत. विशेषतः महासागरांच्या जगात असे अनेक भाग आहेत, जे अजूनही अज्ञात आणि आश्चर्यचकित करणारे आहेत. अशाच एका अद्वितीय शहराचा शोध 25 वर्षांपूर्वी लागला होता, जिथून तब्बल 1.2 लाख वर्षांपासून आगीसारख्या गरम वस्तू बाहेर पडत आहेत.
हा परिसर लॉस्ट सिटी (Lost City) हायड्रोथर्मल व्हेंट सिस्टम म्हणून ओळखला जातो आणि शास्त्रज्ञ अजूनही त्याच्या संशोधनात गुंतले आहेत. येथे सापडलेली माहिती जीवनाच्या उत्पत्तीचा गूढ उलगडू शकते आणि सौरमंडळातील ग्रहांच्या उपग्रहांशी त्याचा संबंध आहे, असेही मानले जाते.
हे अज्ञात शहर कुठे आहे?
1999 मध्ये, वैज्ञानिकांना अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या अटलांटिस मॅसिफ (Atlantis Massif) या प्रदेशात समुद्रसपाटीखाली 2300 फूट खोल एक प्राचीन हायड्रोथर्मल व्हेंट सिस्टम सापडली. हे ठिकाण समुद्राच्या तळाशी असलेल्या पर्वतशिखरांपासून सुमारे 15 किलोमीटर पश्चिमेकडे आहे. येथे शेकडो टॉवर्समधून आगीतून निघणाऱ्या गरम अल्कलाइन द्रव पदार्थ आणि हायड्रोजन वायूंचा प्रवाह दिसतो.
advertisement
हा परिसर किती गरम आहे?
या संपूर्ण भागाला शास्त्रज्ञांनी "लॉस्ट सिटी" असे नाव दिले आहे. 1.2 लाख वर्षांपासून पृथ्वीच्या मँटल आणि समुद्राच्या पाण्यातील रासायनिक क्रियेमुळे येथे हायड्रोजन वायू आणि मिथेनसह विविध द्रव बाहेर येत आहेत. या द्रव्यांचे तापमान सुमारे 90 अंश सेल्सियस आहे. एवढ्या खोल समुद्रातही इतकी उष्णता असणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे!
advertisement
advertisement
वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व
Convention on Biological Diversity ने या भागाला पर्यावरण आणि जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सागरी भाग म्हणून घोषित केले आहे. तसेच, या जागेला जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
advertisement
इथे कोणती जीवसृष्टी आहे?
2020 मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, लॉस्ट सिटीच्या टॉवर्समध्ये सूक्ष्मजीव (microbial life) आढळतात. येथे सर्पेंटिनीझेशन (Serpentinization) आणि विविध रासायनिक प्रक्रिया सुरू असतात, ज्यामुळे हायड्रोजन वायू आणि जैविक रेणू (organic molecules) तयार होतात. तसेच, येथे लहान अकशेरूकी प्राणी (invertebrates), क्रस्टेशियन (crustaceans), गॅस्ट्रोपॉड मॉलस्क (gastropod mollusks) आणि काही समुद्री कीटकही (marine insects) आढळले आहेत.
advertisement
हा शोध एवढा महत्त्वाचा का आहे?
"लॉस्ट सिटी" केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही, तर सौरमंडळातील इतर ग्रह आणि उपग्रहांवरील जीवसृष्टीच्या शोधासाठी देखील महत्त्वाची मानली जात आहे. 2018 मध्ये, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ विल्यम ब्रेझेल्टन (William Brazelton) यांनी सांगितले की, शनीचा चंद्र एन्सेलॅडस (Enceladus) आणि गुरूचा चंद्र युरोपा (Europa) यांच्या बर्फाच्छादित पृष्ठभागाखालील महासागरांमध्येही असेच पर्यावरण असू शकते. मंगळावरही पूर्वी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.
advertisement
"लॉस्ट सिटी" हा पृथ्वीवरील एक अद्वितीय आणि रहस्यमय सागरी प्रदेश आहे, जो केवळ महासागरातील जीवनाच्या उत्पत्तीचा शोध लावण्यास मदत करणार नाही, तर भविष्यात इतर ग्रहांवरील संभाव्य जीवनाच्या शोधासाठी देखील दिशादर्शक ठरू शकतो!
हे ही वाचा : विचित्र संशोधन! हा विशिष्ट रक्त गट माणसाचं वाढवतो आयुष्य? अभ्यासकांनी केले धक्कादायक खुलासे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2025 5:05 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
120000 वर्षांपासून आग ओकत आहे 'हे' रहस्यमय शहर, समुद्राच्या तळाशी 90°c आहे तापमान...


