आंध्र प्रदेशच्या जंगलात सापडल्या 3 मोठ्या गुहा, संशोधकांनी चकित होऊन सांगितले की, "त्या रहस्यमयी गुहेत..."

Last Updated:

आंध्र प्रदेशातील लंकामला वनक्षेत्रात पुरातत्त्व विभागाने (ASI) 800 ते 2000 वर्षे जुने शिलालेख आणि भित्तीचित्रे शोधली आहेत. येथे तीन प्राचीन गुफा आढळल्या असून, त्यातील चित्रांमध्ये प्राण्यांचे, मानवाकृतींचे आणि...

ASI discovery Andhra Pradesh
ASI discovery Andhra Pradesh
ASI discovery Andhra Pradesh : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) आंध्र प्रदेशातील लंकामाला राखीव जंगलातून असा एक ऐतिहासिक खजिना शोधून काढला आहे, जो आपल्याला अनेक महत्त्वाची माहिती देऊ शकतो. ASI ने इथे 800 ते 2000 वर्षं जुने शिलालेख आणि आश्चर्यकारक रॉक पेंटिंग्जचा ऐतिहासिक शोध लावला आहे. हे शोध अलीकडच्या काळातील सर्वात मोठी पुरातत्त्वीय कामगिरी म्हणून वर्णन केले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हा शोध एका व्यापक सर्वेक्षणादरम्यान लागला, ज्यामध्ये तीन प्राचीन गुहा उघड झाल्या. यापैकी एका गुहेत आदिम मानवांनी बनवलेली भित्तीचित्रं सापडली आहेत, ज्यात प्राणी, भूमितीय आकार आणि मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. ही चित्रं महापाषाणयुगीन (लोहयुग) आणि सुरुवातीच्या ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. 2500 ते इ.स. 2 रे शतक) आहेत. ही चित्रं लाल गेरू, केओलिन, प्राण्यांची चरबी आणि हाडांच्या पावडरने बनवलेली आहेत.
advertisement
तेलगू लिपीत लिहिलेले शिलालेख
या शोधात ब्राह्मी (4 थे शतक), शंख लिपी (6 वे शतक), नागरी (संस्कृत) आणि तेलगू लिपीत लिहिलेले शिलालेख आहेत, जे 4 थ्या ते 16 व्या शतकातील आहेत. हे सिद्ध करतं की लंकामाला एकेकाळी एक महत्त्वाचं शैव तीर्थक्षेत्र होतं, जिथे उत्तर भारतातील भाविकही येत असत.
रोमांचक सर्वेक्षण प्रवास
हे सर्वेक्षण 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नित्यपुझकोना, अक्कादेवलाकोंडा आणि बंदिगानी चेलच्या दुर्गम डोंगराळ भागात करण्यात आलं. एकूण 30 शिलालेख ओळखले गेले. सर्वेक्षण पथकाचे प्रमुख के. मुनिरत्नम म्हणाले की, एका स्थानिक वन अधिकाऱ्याने या शिलालेखांचे फोटो पाठवले होते, त्यानंतर या ऐतिहासिक शोधाला सुरुवात झाली. ते म्हणाले, आम्ही हजारो फूट उंच तीव्र डोंगरावर चढलो आणि या शिलालेखांच्या प्रती काढल्या. हे खूप धोकादायक पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं काम होतं.
advertisement
हा शोध काय सांगतो?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लंकामाला एकेकाळी एक प्रमुख शैव तीर्थक्षेत्र होतं, जिथे उत्तर भारतातील भाविकही येत असत. इथे सापडलेले शिलालेख या प्रदेशातील प्राचीन संस्कृती आणि परंपरांची माहिती देतात. हा शोध भारतातील प्राचीन तीर्थयात्रा मार्ग समजून घेण्यास मदत करेल. हा ऐतिहासिक शोध आंध्र प्रदेशातील समृद्ध भूतकाळावर प्रकाश टाकतो. तो भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक नवीन अध्याय जोडतो आणि भविष्यात आणखी महत्त्वाचे शोध लागण्याचा मार्ग मोकळा करू शकतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
आंध्र प्रदेशच्या जंगलात सापडल्या 3 मोठ्या गुहा, संशोधकांनी चकित होऊन सांगितले की, "त्या रहस्यमयी गुहेत..."
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement